अभिनेत्री श्वेता तिवारी ही सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. ती तिच्या कामाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चांगलीच चर्चेत असते. श्वेताचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. तिच्या आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. तर श्वेता ही सोशल मीडियावर सक्रिय राहून चाहत्यांच्या संपर्कात असते. आता तिने केलेली एक पोस्ट पाहून तिथे चाहते घायाळ झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्वेता तिच्या फिटनेसमुळे ओळखली जाते. तिच्याकडे पाहिल्यावर तिला वीस-पंचवीस वर्षांची मुलगी असेल असं कोणालाही पटकन वाटणार नाही. ती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. तर आता तिने बॅकलेस ब्लाऊज परिधान करून तिच्या नवीन फोटोशूटमधील काही फोटो पोस्ट केले आहेत.

आणखी वाचा : “ती अनेकदा माझे फोनही उचलत नाही…” पलक तिवारीचा आई श्वेता तिवारीबद्दल मोठा खुलासा; म्हणाली, “मी सलमान खानच्या…”

श्वेताने नुकतंच नवीन फोटोशूट केलं. यामध्ये तिने ऑफ व्हाईट कलरचा लॉंग स्कर्ट आणि त्यावर त्याच रंगाचा बॅकलेस ब्लाऊज परिधान केलेला दिसत आहे. हे फोटो काढताना तिने अगदी नॅचरल मेकअप केलेला असून केस मोकळे सोडले आहेत. आज तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिने या लूकमधील काही फोटो पोस्ट केले. आता हे फोटो पाहून नेटकरी फिदा झाले आहेत.

हेही वाचा : “माझी आई म्हणजे ‘देसी आंटी’…,” श्वेता तिवारीबद्दल लेक पलकचा मोठा खुलासा, म्हणाली, “२० रुपयेही खर्च करण्यासाठी…”

तिच्या एका चाहत्याने या फोटोंवर कमेंट करत लिहिलं, “या वयात हिच्याइतकी स्वतःचा फिटनेस सांभाळू शकणारी दुसरी अभिनेत्री नाही.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “ही ४२ वर्षांची असूनही २२ वर्षांची असल्यासारखी दिसते.” तर आणखी एकाने लिहिलं, “ही तिच्या मुलीपेक्षाही फिट आणि सुंदर दिसते.” त्यामुळे आता या फोटोंवर कमेंट करत श्वेताचे चाहते तिच्या फिटनेसचं कौतुक करत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress shweta tiwari shared glamorous photos of her fans gets shocked rnv