Simran Budharup Lalbaugcha Raja Shocking Experience: सगळीकडे गणेशोत्सवाचा (Ganesh Utsav 2024) उत्साह आहे. त्यामुळे लोक बाप्पाच्या दर्शनासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जातात. मुंबईत अनेक सेलिब्रिटी गणेशोत्सवादरम्यान सिद्धिविनायक व लालबागचा राजाच्या दर्शनासाठी जातात. ‘पंड्या स्टोअर’ फेम अभिनेत्री सिमरन बुधरूप तिच्या आईबरोबर लालबागचा राजाच्या (Lalbaugcha Raja Darshan) दर्शनासाठी गेली होती. तिथे तिच्याबरोबर धक्कादायक प्रकार घडला.

सिमरनने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिने दर्शनाला जाण्याचा अनुभव खूप वाईट होता, असं व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. सिमरनने व्हिडीओ शेअर करून लालबागचा राजा पंडालच्या बाऊन्सर्सनी तिला आणि तिच्या आईला धक्काबुक्की केली असा आरोप केला आहे.

Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Maharashtrachi Hasya Jatra Fame Rohit Mane new car
Video : “साताऱ्याची माणसं ‘THAR’ वेडी…”, म्हणत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी! सर्वत्र होतंय कौतुक
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
Navri Mile Hitlarla
Video: नाराज झालेल्या लीलासाठी एजे करणार डान्स; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “स्वप्न खरं होतं तरी…”
Navri MIle Hitlarla
Video : “तू या लूकमध्येसुद्धा…”, सुनांचा डाव फसणार, लीलाचा धांदरटपणा एजेंना आवडणार; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “एक नंबर एजे”

आर्याने निक्कीच्या थेट कानाखाली वाजवली! दोघींमध्ये जोरदार वाद; ‘बिग बॉस’ देणार शिक्षा; म्हणाले, “हे अतिशय निंदनीय…”

सिमरनने सांगितला धक्कादायक अनुभव

सिमरनने व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत लिहिलं, “आज मी माझ्या आईबरोबर लालबागचा राजाचे आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते, पण तेथील कर्मचारी आमच्याशी ज्या पद्धतीने वागले, त्यामुळे आमचा अनुभव वाईट ठरला. माझी आई फोटो काढत असताना कर्मचाऱ्यांपैकी एका व्यक्तीने तिचा फोन हिसकावून घेतला. ती रांगते माझ्या मागे होती. तिने दर्शनासाठी जास्त वेळ घेतला नव्हता. तिच्यापुढे मी असल्याने मी दर्शन घेत होते आणि ती मागे असल्याने फोटो काढत होती. आईने फोन परत मागण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनी तिला धक्काबुक्की केली.”

रेखा यांच्याबरोबरच्या नात्याबद्दल विचारल्यावर अमिताभ बच्चन म्हणाले होते, “ती माझी…”

तिने पुढे लिहिलं, “मी हस्तक्षेप केल्यावर बाऊन्सर्सनी माझ्याशी गैरवर्तन केलं. मी त्यांच्या वर्तणुकीचा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केल्यावर त्यांनी माझा फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला. (या व्हिडीओमध्ये ओरडणारी मी आहे. “असं करू नका, तुम्ही काय करताय?” मी अभिनेत्री आहे हे कळल्यावर ते परत गेले.”

“ही घटना जागरूकता आणि जबाबदारीची गरज असल्याचं दर्शवते. सकारात्मकता आणि आशीर्वादासाठी चांगल्या हेतूने लोक अशा ठिकाणी भेट देतात. त्याऐवजी, आम्हाला आक्रमकता आणि अपमान सहन करावा लागला. गर्दीवर नियंत्रण ठेवणं आव्हानात्मक आहे, हे मला माहीत आहे. पण भाविकांशी कोणतेही गैरवर्तन न करता सुव्यवस्था राखणे ही कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे,” असंही सिमरन म्हणाली.

Simran Budharup at Lalbaugcha Raja Darshan
अभिनेत्री सिमरन बुधरूप (फोटो – इन्स्टाग्राम)

“घडलेल्या प्रकाराकडे लक्ष वेधण्यासाठी मी हा व्हिडीओ शेअर करत आहे. या व्हिडीओनंतर आयोजक आणि कर्मचारी इथे येणाऱ्या भाविकांशी आदराने वागतील अशी आशा आहे,” असंही सिमरनने कॅप्शनमध्ये लिहिलं.

Story img Loader