छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो म्हणून ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाला ओळखले जाते. महाराष्ट्रातील घराघरात हा कार्यक्रम अगदी आवडीने पाहिला जातो. चित्रपट किंवा मालिकांचे अनेक कलाकार या कार्यक्रमात हजेरी लावत असतात. काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमात गौर गोपाल दास यांनी हजेरी लावली होती. नुकतंच अभिनेत्री स्नेहल शिदमने त्यांच्याबद्दल शेअर केलेल्या पोस्टने लक्ष वेधलं आहे.
स्नेहल शिदम ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. स्नेहलने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. यात ती गौर गोपाल दास यांच्याबाजूला उभं राहून फोटो काढत असल्याचे दिसत आहे. त्याला तिने हटके कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : “आम्ही दोघंही…” स्नेहल शिदमबरोबरच्या ‘त्या’ फोटोवर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बनेची पहिली प्रतिक्रिया
“मी हल्ली माझ्याबद्दल लोकांना समजावून सांगणं बंद केलं आहे, कारण जे लोक माझ्यावर प्रेम करतात त्यांना स्पष्टीकरणाची गरज कधीच नव्हती आणि जे लोक माझ्यावर प्रेम करत नाहीत त्यांना माझ्या स्पष्टीकरणाची पर्वा नाही – गौर गोपाल दास गुरुजी”, असे तिने या फोटोला कॅप्शन देताना म्हटले आहे.
आणखी वाचा : “कॉलेजपासून…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बनेने स्नेहलबरोबर रिलेशनशिपच्या चर्चांवर सोडलं मौन
तिच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. तिने गौर गोपाल दास यांचे टाकलेले हे वाक्य तंतोतंत जुळत असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. स्नेहल ‘चला हवा येऊ द्या ‘च्या ‘होऊ द्या व्हायरल’ या पर्वाची विजेती होती. किर्ती कॉलेजमध्ये तिचं शिक्षण झालं. शिवाय ‘स्वीटी सातारकर’ या चित्रपटामधून तिने मोठ्या पडद्यावरही पदार्पण केलं.