मराठी इंडस्ट्रीत असे बरेच कलाकार मंडळी ज्याचं इतर कलाकारांबरोबर वेगवेगळं नातं आहे. फक्त नवरा बायको नाही तर भाऊ, बहिणी, नणंद, भावजय अशी अनेक नाती आहेत. काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री स्पृहा जोशी व गायक प्रथमेश लघाटे यांच्यामधील नात्याचा खुलासा झाला होता. तिच्या सासरकडून प्रथमेश लघाटेशी नातं असल्याचं समोर आलं होतं. प्रथमेश स्पृहाचा सासरा असल्याचं समजलं होतं. आता असंच काहीस नातं अभिनेत्री सोनाली खरे, माधवी निमकर आणि संगीत संयोजक व संगीतकार तुषार देवल यांच्यात असल्याचं समोर आलं आहे.
हेही वाचा – गौरी सावंत यांच्याबरोबर ‘ताली’ टीमनं पाहिलं ‘चारचौघी’ नाटक; रवी जाधव म्हणाले, “असं क्वचितच…”
अलीकडेच एका एंटरटेन्मेंट यूट्युब चॅनेलच्या कार्यक्रमात अभिनेत्री स्वाती देवल व तुषार देवल सहभागी झाले होते. यावेळी दोघांनी सोनाली खरे, माधवी निमकर यांच्याबरोबर असलेल्या खऱ्या नात्याचा खुलासा केला.
हेही वाचा – Video: ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत मोठा ट्विस्ट, स्वरा मल्हार कामत नाही तर…; पाहा नवा प्रोमो
हेही वाचा – “ती जागा हाफ चड्डीची नाही”, गणेश भक्तांसाठी जारी केलेल्या ड्रेसकोडवर दीपाली सय्यद यांची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “संपूर्ण महाराष्ट्रात…”
स्वाती देवल व सोनाली खरे या बालपणीच्या मैत्री आहेत. दोघी एकाच शाळेत एकाच बेंचवर बसायच्या. शिवाय दोघी एकाच डान्स क्लास, अभ्यासाच्या क्लासला होत्या. दोघींचं एकमेकांच्या घरी जाण्याचं असायचं. पण स्वातीला सोनाली ही पती तुषार देवलची मावस बहीण असल्याचं माहित नव्हतं. ही गोष्ट स्वातीला लग्नानंतर कळाली, असं तिनं या मुलाखतीत सांगितलं. तसंच सोनाली खरे आणि माधवी निमकर या दोघी सख्या मावस बहिणी आहेत. त्यामुळे माधवी देखील तुषारची मावस बहीण लागते, असं त्याने सांगितलं. माधवी व तुषारमधील हे नातं देखील स्वातीला लग्नानंतर कळालं.
दरम्यान, देवल कपलच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, दोघांची निर्मिती असलेलं ‘गौराई आलिया माहेरा’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात स्वाती देवलबरोबर अभिनेत्री स्वाती पानसरे आणि गायिका सायली कांबळे झळकली आहे. याव्यतिरिक्त स्वाती ‘राणी मी होणार’ या मालिकेत पाहायला मिळत आहे. तर तुषार ‘चला हवा येऊ द्या’मध्ये दिसत आहे.