कलाकार अनेकदा त्यांच्या कामांबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. मराठी मनोरंजनसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांचे नातेवाईकही सिनेसृष्टीत काम करत आहेत. यापैकी अनेक नाती प्रेक्षकांना परिचयाची आहेत तर काही नव्याने समोर येत आहेत. अभिनेत्री स्पृहा जोशी आणि गायक प्रथमेश लघाटे यांच्यातही एक खास नातं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गेली अनेक वर्षं स्पृहा जोशी आणि प्रथमेश लघाटे मनोरंजनसृष्टीत कार्यरत आहेत. स्पृहा एक लोकप्रिय अभिनेत्री, कवयित्री, सूत्रसंचालिका आहे. तर प्रथमेश लघाटे हा लोकप्रिय गायक आहे. स्पृहा जोशीने काही वर्षांपूर्वी वरद लघाटे याच्याशी लग्न केलं. तर आता सासरकडून स्पृहाचं प्रथमेश लघाटेशी नातं असल्याचं समोर आलं आहे.

आणखी वाचा : स्पृहा जोशीचा युट्यूब चॅनल हॅक, माहिती देत अभिनेत्री म्हणाली, “आता सगळे व्हिडीओ…”

प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी नुकतेच एक पोस्ट शेअर करत त्यांच्या प्रेमाची कबुली दिली. यावर स्पृहा जोशीने केलेल्या कमेंटने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. प्रथमेश आणि मुग्धाच्या या पोस्टवर कमेंट करत तिने लिहिलं, “वा बुवा…!वेलकम वहिनी.” तर त्यावर गायक अवधूत गुप्ते रिप्लाय देत म्हणाला , “वेलकम! जीजू का नाही?” त्यावर स्पृहा म्हणाली, “अहो सर, ते आधीच सासरे आहेत माझे.” त्यावर प्रथमेश लघाटेची होणारी पत्नी मुग्धा वैशंपायनने लिहिलं, “हो. म्हणजे मला जेव्हा हे कळलं तेव्हा माझंही असंच झालं, की मी सासू!!!! नाहीsss” त्यावर प्रथमेशने रिप्लाय देत लिहिलं, “सासरा आहे मी तिचा.”

हेही वाचा : यांचं ठरलं! प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी दिली प्रेमाची कबुली, पोस्ट शेअर करत म्हणाले…

आता स्पृहा, प्रथमेश, मुग्धा आणि अवधूत गुप्ते यांच्या या कमेंट्स खूप चर्चेत आल्या आहेत. आता अनेक जण यावर प्रतिक्रिया देत आश्चर्य व्यक्त करत आहेत.