अभिनेत्री स्पृहा जोशी ही मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आतापर्यंत तिने अनेक नाटकं मालिका चित्रपटांमधून उततमोत्तम भूमिका केल्या. तिच्या संपूर्ण कारकिर्दीत तिला तिच्या कुटुंबीयांची भक्कम साथ लाभली.
आतापर्यंत अनेक मुलाखतींमधून तिच्या कुटुंबीयांबद्दल भरभरून बोलली आहे. तिच्या आई-वडिलांचा, तिच्या नवऱ्याचा, याचबरोबर तिच्या सासू-सासर्यांचा तिला कसा पाठिंबा मिळत आला आहे हे तिने अनेकदा सांगितलं आहे. तर आता पुन्हा एकदा तिने तिच्या सासू-सासर्यांचा उल्लेख करत ते तिला कसं समजून घेतात आणि काम करण्यासाठी कसं प्रोत्साहन देतात हे सांगितलं आहे.
आणखी वाचा : “तो माझा सासरा आहे पण…”, स्पृहा जोशीने दिली तिच्या आणि प्रथमेश लघाटेच्या नात्यावर प्रतिक्रिया, म्हणाली…
सुलेखा तळवलकर हिच्या यू ट्यूब चॅनेलवरील ‘दिल के करीब’ या कार्यक्रमात स्पृहा म्हणाली, “माझ्या करिअरला माझ्या आई-बाबांनी जितका पाठिंबा दिला तेवढाच किंबहुना त्याहून जास्त पाठिंबा माझ्या सासू-सासर्यांनी दिला आहे. माझं खरं काम माझ्या लग्नानंतर सुरू झालं. माझ्या सासूबाई अजूनही मी बाहेर जाताना माझा डबा भरून ठेवतात, मी काम करून आल्यावर मला ज्या पद्धतीचं आवडतं त्या पद्धतीचं जेवण घरी तयार असतं.”
हेही वाचा : “मराठी भाषेतून शिकणारी मुलं…”, स्पृहा जोशीने मांडलं स्पष्ट मत, म्हणाली…
पुढे ती म्हणाली, “एखाद्या फॅमिली फंक्शन असेल, कोणाचा साखरपुडा असेल, कोणाचं लग्न असेल, कोणी बोलावलं असेल या सगळ्या गोष्टी ओघाओघाने येतात जेव्हा आपण त्या प्रवासाला लागतो. पण त्यांनी माझ्याकडून ही कधी अपेक्षा केली नाही. त्यामुळे त्यांचं असं असणं ही माझ्यासाठी खूप सुंदर गोष्ट आहे. मी खरंच स्वतःला भाग्यवान समजते. आम्ही एकत्रच राहतो आणि असं आमचं चौघांचं छान कुटुंब आहे.” तर आता तिचं हे बोलणं चर्चेत आलं असून त्यांच्या कौटुंबिक बॉण्डिंगच तिचे चाहते कौतुक करत आहेत.