काही दिवसांपूर्वी गायक प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी एक पोस्ट शेअर करत ते दोघं एकमेकांना डेट करत असल्याचं जाहीर केलं. त्यांनी ही पोस्ट शेअर करताच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. त्यांच्या चाहत्यांबरोबरच मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांनीही त्यांचं अभिनंदन केलं. तर या पोस्टवर अभिनेत्री स्पृहा जोशीने केलेल्या कमेंटने सर्वांचं लक्ष वेधलं. प्रथमेश तिचा सासरा आहे असा खुलासा या कमेंट्समधून झाला. आता या सगळ्यावर स्पृहाने भाष्य केलं आहे.

आणखी वाचा : “मराठी भाषेतून शिकणारी मुलं…”, स्पृहा जोशीने मांडलं स्पष्ट मत, म्हणाली…

Saif Ali Khan Sister Saba Ali Khan Pataudi emotional post
“भाईजान आम्हाला तुझा…”, सैफ अली खानसाठी बहिणीची भावुक पोस्ट, बालपणीचा फोटो शेअर करत म्हणाली…
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Image Of Supriya Sule And Ajit Pawar
Supriya Sule : “मी बोलते, पण अजित पवार माझ्याशी…”, पवार कुटुंबीयांतील दुराव्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Sameer Paranjape
‘थोडं तुझं थोडं माझं’ फेम समीर परांजपेने गायलं हटके स्टाईलने ‘नाच रे मोरा’ गाणं; नेटकरी म्हणाले, “विचार नव्हता केला…”
Monika Dabade
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात अभिनेत्री झाली भावुक; ‘ठरलं तर मग’च्या टीमबद्दल म्हणाली, “आतापर्यंत हे माझ्यादेखत…”
aadar jain alekha advani wedding videos
३ वर्षे बॉलीवूड अभिनेत्रीला केलं डेट, ब्रेकअपनंतर तिच्याच मैत्रिणीबरोबर थाटला संसार; अभिनेत्याच्या लग्नातील Video Viral
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”

प्रथमेश आणि मुग्धाच्या या पोस्टवर कमेंट करत स्पृहाने लिहिलं होतं, “वा बुवा…!वेलकम वहिनी.” तर त्यावर गायक अवधूत गुप्ते रिप्लाय देत म्हणाला , “वेलकम! जीजू का नाही?” त्यावर स्पृहा म्हणाली, “अहो सर, ते आधीच सासरे आहेत माझे.” त्यावर प्रथमेश लघाटेची होणारी पत्नी मुग्धा वैशंपायनने लिहिलं, “हो. म्हणजे मला जेव्हा हे कळलं तेव्हा माझंही असंच झालं, की मी सासू!!!! नाहीsss” त्यावर प्रथमेशने रिप्लाय देत लिहिलं, “सासरा आहे मी तिचा.” त्यांच्या या कमेंट्स वाचून अनेकांच्या भुवया उंचावल्या. या कमेंट्सची जोरदार चर्चा रंगली. आता स्पृहाने सुलेखा तळवलकर हिच्या यू ट्यूब चॅनेलवरील ‘दिल के करीब’ या कार्यक्रमामध्ये तिच्या आणि प्रथमेशच्या नात्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा : लाल रंगाचे केस अन्…; ऐतिहासिक मालिकेचं शूटिंग संपताच स्पृहा जोशीने बदलला लूक, चाहते म्हणाले…

स्पृहा म्हणाली, “प्रथमेश लघाटे हा वरदच्या अगदीच सख्या नातेवाईकांपैकी आहे. नात्याने ते माझे सासरे बुवा लागतात. मध्यंतरी त्याचा आणि मुग्धाच लग्न ठरल्यावर आमच्या नात्याबद्दलही सगळ्यांना कळलं आणि अनेक गमतीशीर गोष्टीही झाल्या होत्या. आता मुग्धास स्पृहाची सासू होणार अशा अनेक बातम्या सोशल मीडियावर आल्या होत्या. पण प्रथमेश नात्याने माझा सासरा असला तरी आम्हाला तो धाकट्या भावासारखाच आहे.”

Story img Loader