‘सूर नवा ध्यास नवा’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे. या कार्यक्रमाची आतापर्यंतची सगळी पर्व खूप गाजली. पण ‘सूर नवा ध्यास नवा- छोटे सूरवीर’ हे पर्व विशेष चर्चेत आलं. याचे मुख्य कारण म्हणजे या पर्वातील मॉनिटर हर्षद नायबळ.
त्या पर्वामध्ये लहान मुलं स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. तर तेव्हा साडेचार- पाच वर्षांचा असलेला हर्षदही या कार्यक्रमाचा एक भाग होता. त्याच्या निरागसपणाने, त्याच्या गाण्याने, त्याच्या मस्तीने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली. याचबरोबर त्याची आणि स्पृहा जोशीची केमिस्ट्रीही सुपरहिट झाली. त्यानंतर हर्षद ‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेमध्ये दिसला. आता अनेक वर्षांनी स्पृहा आणि हर्षदची भेट झाली आहे.
हेही वाचा : “माझ्या सासू-सासऱ्यांनी कधीच…”, स्पृहा जोशीने व्यक्त तिच्या मनातल्या भावना
स्पृहा नुकतीच एका कार्यक्रमाच्या निमित्ताने छत्रपती संभाजी नगर येथे गेली होती. हर्षदही मूळचा तिथलाच. या कार्यक्रमाच्या निमित्ताने दीर्घ काळानंतर त्या दोघांची भेट झाली. या दरम्यानचा त्या दोघांचे काही फोटो स्पृहाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले. त्या फोटोंमध्ये ते एकमेकांबरोबर मस्ती करताना दिसत आहेत. त्या दोघांचे हे खास फोटो शेअर करत तिने लिहिलं, “हा आधीच मोठा झाला आहे. काही बॉण्ड कधीही बदलत नाहीत.” तर आता त्या दोघांचं हे रियुनियन त्यांच्या चाहत्यांना खूप आवडत आहे.