काही महिन्यांपूर्वी झी मराठीवर ‘लोकमान्य’ ही मालिका सुरू झाली. ही मालिका लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित आहे. परंतु ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं काही दिवसांपूर्वीच समोर आलं. आता या मालिकेतील एक नवीन गाणं प्रेक्षकांसमोर आलं आहे. विशेष म्हणजे हे गाणं स्पृहा जोशीने लिहिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या मालिकेत अभिनेता क्षितिष दाते याने लोकमान्य टिळकांची भूमिका साकारली आहे, तर अभिनेत्री स्पृहा जोशीने लोकमान्य टिळकांची पत्नी सत्यभामाबाई यांची भूमिका साकारली आहे. तर आता या मालिकेसाठी अभिनेत्री बरोबरच स्पृहा गीतकारही झाली आहे.

आणखी वाचा : “मराठी भाषेतून शिकणारी मुलं…”, स्पृहा जोशीने मांडलं स्पष्ट मत, म्हणाली…

आज ‘लोकमान्य’ या मालिकेच्या टीमने मालिकेसाठी तयार करण्यात आलेलं एक गाणं प्रदर्शित केलं. या गाण्यातून लोकमान्य टिळकांचा जीवनप्रवास दिसत आहे.
“विझत चालल्या या भूमीला स्वराज्य हा उद्गार दिला,
मरू घातल्या लाख मनांना अभिमानाचा श्वास दिला…”
असे या गाण्याचे शब्द आहेत. या गाण्यातून लोकमान्य टिळकांचं संपूर्ण कार्य प्रेक्षकांसमोर उलगडतं. हे गाणं स्पृहाने लिहिलं असून शुभंकर शेंबेकर याने सांगीतिबद्ध केलं आहे. तर जयदीप वैद्यने हे गाणं गायलं आहे.

हेही वाचा : काय सांगता! स्पृहा जोशी आणि प्रथमेश लघाटे आहेत एकमेकांचे नातेवाईक, जाणून घ्या काय आहे दोघांच्यात नातं?

हे गाणं सोशल मीडियावरून समोर येताच या गाण्याचं चाहत्यांबरोबरच अनेक कलाकारही कौतुक करत आहेत. हे गाणे ऐकत असताना खरोखरच अंगावर शहारा आला अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. तर दुसरीकडे, या आठवड्यात शनिवारी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याने या मालिकेचे प्रेक्षक दुःख व्यक्त करत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress spruha joshi wrote a new song for her lokmanya serial goes viral rnv
Show comments