अभिनेत्री सुंबूल तौकीर खानचे वडील लवकरच दुसरं लग्न करणार आहेत. तिच्या वडिलांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला असून खुद्द सुंबूलने ही आनंदाची बातमी दिली आहे. ती सहा वर्षांची असताना तिच्या पालकांचा घटस्फोट झाला होता. सुंबूलचे वडील तौकीर हसन खान यांनी दोन्ही मुलींचं संगोपन केलं आणि करिअरमध्ये पाठिंबा दिला.

हेही वाचा – “मी रात्रभर…” कॅमेऱ्यांसमोर प्रसिद्ध अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड असं काही म्हणाला की नेटकरी संतापले; म्हणाले…

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
girl bedroom
“माझ्या बेडरुममध्ये…”, जेईईचा अभ्यास करणाऱ्या मुलीवर पाळत ठेवण्याकरता पालकांचा ‘हा’ निर्णय तुम्हाला पटतो का?
andhra pradesh couple suicide
आई-वडिलांनी इंजिनिअर बनवलं, मुलगा रिक्षाचालक झाला; तृतीयपंथी जोडीदाराशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यावर पालकांनी…
Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
Shinde Fadnavis move by transferring Gadchiroli District Collector Gadchiroli news
गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली करून शिंदेना फडणवीसांचा शह?
kalyan east minor girl rape case
कल्याण पूर्वेतील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी दोन जण अटक, दाढी करून पेहराव बदलत असताना विशाल गवळीवर पोलिसांची झडप

१९ वर्षीय सुंबूलचे वडील पुढच्या आठवड्यात लग्न करणार आहेत. ‘ई-टाइम्स’च्या वृत्तानुसार, सुंबूलची धाकटी बहीण सानियाने तिच्या वडिलांना दुसऱ्या लग्नासाठी तयार केलंय. सुंबूलच्या होणाऱ्या दुसऱ्या आईचं नाव निलोफर आहे. तीही घटस्फोटित आहे व तिला एक मुलगी आहे. या लग्नासाठी सुंबूल व तिची बहीण खूप उत्साही आहेत. सुंबूलने वडिलांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल तिच्या भावना व्यक्त केल्या.

सुंबूल म्हणाली, “मी माझ्या वडिलांसाठी खूप आनंदी आहे. मी या दोघींचे माझ्या कुटुंबात स्वागत करते. फक्त आईच नाही तर तिच्यासोबत आम्हाला लहान बहीणही मिळत आहे. आम्ही सर्व उत्सुक आहोत. माझ्या वडिलांनी आम्हाला नेहमीच प्रेरणा दिली आहे. मी आणि माझी धाकटी बहीण बाबांसाठी खूप आनंदी आहोत. ‘बिग बॉस १६’ मध्ये मला भेटायला आलेले माझे मोठेबाबा इकबाल हुसैन खान यांनी या लग्नासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आणि आम्ही त्यांचे आभारी आहोत.”

दरम्यान, सुंबूलचे वडील कविता लिहितात, तसेच ते मालिकांमध्ये नृत्यदिग्दर्शन करायचे. सुंबूल ‘बिग बॉस’च्या घरात असताना तिचे वडील त्यांच्या वक्तव्यांमुळे खूप चर्चेत राहिले होते.

Story img Loader