अभिनेत्री सुप्रिया पाठारे या मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. तर त्यांचा मुलगा मिहिर पाठारे हा प्रोफेशनल शेफ आहे. परदेशात प्रसिद्ध असणारी फूड ट्रकची संकल्पना त्याने ठाण्यात सुरू केली. तिथे यश मिळवल्यानंतर आता त्याने ठाण्यात स्वतःच नवीन हॉटेल सुरू केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाण्यातील खेवरा सर्कल, रामजी हॉटेलच्या समोर, पोखरण, रोड नं २ इथे त्याचं हॉटेल असून नुकतंच या हॉटेलचं उद्घाटन झालं. या हॉटेलला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता लेकाच्या या नवीन व्यवसायाबद्दल अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी वाचा : ‘असं’ आहे सुप्रिया पाठारे यांच्या लेकाने ठाण्यात सुरू केलेलं नवीन हॉटेल, पाहा खास झलक

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुप्रिया पाठारे म्हणाल्या, “सुरुवातीला खूप टेन्शन आलं होतं. सुरुवातीला एक फूड ट्रक होता. त्याची जागा छोटी होती आणि तो मॅनेज करता येण्यासारखा होता. हॉटेल सुरू करायचं ठरवलं तेव्हा जागेपासून सगळं उभं केलं. ते येणाऱ्या लोकांनाही ते छान वाटलं पाहिजे. आपण जेव्हा दुसऱ्या एखाद्या हॉटेलमध्ये जातो तेव्हा हेच बघतो की तिथली जागा स्वच्छ आहे की नाही आणि त्या हॉटेलमधली चव कशी आहे. त्यामुळे मी मिहिरला हेच सांगितलं होतं की, बाकी काहीही असो पण चव उत्तम हवी आणि जागा स्वच्छ हवी.”

हेही वाचा : हर्षदा खानविलकरने केलं सुप्रिया पाठारे यांच्या लेकाच्या नवीन हॉटेलचं उद्घाटन, पदार्थांच्या चवीबद्दल म्हणाली…

या हॉटेलमधील मेन्यूही सुप्रिया यांनी सांगितला. त्या म्हणाल्या, “आपल्या हॉटेलमध्ये पावभाजी, मसाला पाव हे तर आधीपासून आहेच. पण सध्या सोया चापचं खूप फॅड आहे. प्रोटीन म्हणून लोकांना ते खायला आवडतं. त्यात आपल्या हॉटेलमध्ये दहा-बारा प्रकारचे वेगवेगळे फ्लेवर आहेत, याचबरोबर सोया चाप बिर्याणीही आहे, पनीर टिक्का आहे, पनीर टिक्का बिर्याणी आहे. आता हा अधिक महिना सुरू आहे. वाढीचा महिना असल्याने आपला व्यवसायही वाढणार याची आम्हाला खात्री आहे. याचबरोबर श्रावणही येतोय तर लोक नॉनव्हेजकडून व्हेजकडे वळतात. त्यामुळे काहीतरी चटपटीतही खायला हवं म्हणून हा सगळा अट्टाहास आहे.”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress supriya pathare reacts to her son new hotel in thane and shares the menu rnv
Show comments