अभिनेत्री सुप्रिया पाठारे या मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. तर त्यांचा मुलगा मिहिर पाठारे हा प्रोफेशनल शेफ आहे. परदेशात प्रसिद्ध असणारी फूड ट्रकची संकल्पना त्याने ठाण्यात सुरू केली. तिथे यश मिळवल्यानंतर काही दिवसांपूर्वीच त्याने ठाण्यात स्वतःचं ‘महाराज’ हे नवीन हॉटेल सुरू केलं. हॉटेल सुरू केल्यानंतर दोन महिन्यांतच हे हॉटेल अनेक दिवस बंद राहिल्याने याबद्दल विविध चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यावर सुप्रिया पाठारे यांनी अखेर भाष्य करत खरं काय ते सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुप्रिया पाठारे गेले अनेक महिने आपल्याला ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेतून भेटायला येत आहेत. तर मालिकेच्या शूटिंगमधून वेळ काढून त्या त्यांच्या लेकाच्या या नवीन हॉटेलमध्ये अनेकदा जात असतात. पण हे हॉटेल गेले काही दिवस बंद होतं. या हॉटेलला लागलेलं कुलूप पाहून हे हॉटेल कायमचं बंद झालं आहे की काय? अशा विविध चर्चा रंगू लागल्या. आता या सगळ्यावर सुप्रिया पाठारे यांनी भाष्य केलं आहे.

आणखी वाचा : ‘असं’ आहे सुप्रिया पाठारे यांच्या लेकाने ठाण्यात सुरू केलेलं नवीन हॉटेल, पाहा खास झलक

सुप्रिया पाठारे यांनी सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये त्या म्हणाल्या, “नमस्कार, तुम्हा सगळ्यांनाच माहित आहे की खेवरा सर्कलला रामजी हॉटेलच्या समोर आपलं महाराज हे हॉटेल आहे. तिथे पावभाजी स्पेशल मिळते. तुमच्यापैकी अनेकांनी तिथे त्याचा आस्वाद घेतला आहे. गेल्या काही दिवसात अनेक गोष्टी कानावर आल्या, अनेकांचे फोन आले की त्यांना असं कळलं की हे हॉटेल बंद झालं. पण असं काहीही नाही.”

हेही वाचा : “फूड सेंटर सुरू करायचं ठरवलं तेव्हा…”, लेकाच्या हॉटेलबद्दल सुप्रिया पाठारेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या, “पाव भाजीबरोबरच इथे…”

पुढे त्या म्हणाल्या, “२१ तारखेला माझ्या आईचा निधन झालं त्यामुळे हॉटेल बंद ठेवलं होतं. काल तिचं कार्य झालं आणि आता आम्ही हे हॉटेल पुन्हा सुरू करणार आहोत. कारण हा व्यवसाय आहे तो सुरू ठेवायलाच पाहिजे. त्यामुळे ३ नोव्हेंबर पासून पुन्हा एकदा खवय्यांसाठी आपलं ‘महाराज’ हॉटेल खुलं होईल. त्यामुळे मी सर्वांना विनंती करेन की नक्की या आणि पावभाजीचा आस्वाद घ्या.” त्यामुळे सुप्रिया पाठारे यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमुळे हे हॉटेल बंद झाल्याचा अनेकांचा गैरसमज दूर झाला आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress supriya pathare reveals her son new hotel is not shut down rnv