‘स्टार प्लस’ वाहिनीवर प्रसारित होणारी ‘अनुपमा’ ही मालिका सध्या खूप चर्चेत आहे. सोशल मीडियावर या मालिकेबद्दल बरंच काही बोललं जातं. या यामध्ये रुपाली गांगुली यांनी अनुपमा शहा हे प्रमुख पात्र साकारले आहे. मध्यंतरी त्या मनोरंजक्षेत्रापासून लांब होत्या आणि आता या मालिकेद्वारे त्यांनी छोट्या पडद्यावर कमबॅक केले आहे. ही मालिका नेहमीच टीआरपीच्या स्पर्धेमध्ये अव्वल स्थानावर असते. लिखाण आणि सादरीकरण या दोन महत्त्वपूर्ण विभागामुळे या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांची या मालिकेमध्ये एंट्री होणार अशी जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. जस्टशोबिजने दिलेल्या वृत्तानुसार, अनुपमा ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणार आहे, त्या कॉलेजमधल्या शिक्षिकेचे पात्र सुप्रिया पिळगांवकर साकारणार असल्याचं म्हंटलं जात होतं. शिवाय त्यांनी यासाठी ऑडिशन दिल्याचीही चर्चा होत होती, पण आता सुप्रिया पिळगांवकर यांनी स्वतःच या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. अशी कोणतीही भूमिका सुप्रिया साकारणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

आणखी वाचा : “दादुस, आमची वहिनी…” प्रथमेश परबच्या ‘त्या’ इन्स्टाग्राम पोस्टची सॉलिड चर्चा

‘इटाइम्स’शी संवाद साधताना सुप्रिया म्हणाल्या, “ही गोष्ट खूप आश्चर्यकारक आहे, मीसुद्धा याबद्दल गेले काही दिवस सोशल मीडियावर वाचत आहे. मला या मालिकेच्या निर्मात्यांकडून एक फोनही आलेला नाही किंवा मी कोणती ऑडिशनही दिलेली नाही. ही मालिका खरंच फार रंजक आहे. मी ही मालिका नियमित पाहते पण मला यातील भूमिकेसाठी विचारणा झालेली नाही.”

सुप्रिया या सध्या टेलिव्हिजनपासून दूर असल्या तरी लवकरच त्या छोट्या पडद्यावर छानशा भूमिकेत दिसतील असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. सचिन पिळगावकर यांच्याप्रमाणेच सुप्रिया यांनीही मराठीसह हिंदी माध्यमांमध्ये काम केले आहे. त्यांची दूरदर्शनवर प्रदर्शित होणारी ‘तू तू मैं मैं’ ही मालिका खूप गाजली होती. ‘लाखो में एक’, ‘ससूराल गेंदा फूल’, ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’, ‘इश्कबाज’ अशा लोकप्रिय हिंदी मालिकांमध्ये त्यांनी काम केले.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress supriya pilgaonkar clarifies about rumours of her role in star plus anupama serial avn