‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘जय मल्हार’ ही पौराणिक मालिका चांगलीच गाजली होती. खंडेरायाच्या जीवनावर आधारित असलेल्या या मालिकेने तीन वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. अजूनही ‘जय मल्हार’ मालिकेच शीर्षकगीत मराठी रसिक प्रेक्षकांच्या ओठांवर आहे. याच मालिकेतील म्हाळसा म्हणजेच अभिनेत्री सुरभी हांडे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

अभिनेत्री सुरभी हांडेने ‘जय मल्हार’ मालिकेत साकारलेल्या म्हाळसा पात्राने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. त्यानंतर सुरभीने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. केदार शिंदे दिग्दर्शित ‘अगं बाई अरेच्चा २’ चित्रपटात सुरभी पाहायला मिळाली. आता सुरभी ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत झळकणार आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – Video: “जर BMC आणि कचरा टाकणारी जनता निर्लज्ज…”, अस्वच्छेवरून शशांक केतकर पुन्हा संतापला; म्हणाला, “आता खपवून घेणार नाही…”

महाराष्ट्राची कुलस्वामिनी ‘आई तुळजाभवानी’ या मालिकेत आतापर्यंत देवीचे अनेक अवतार पाहायला मिळाले आहेत. देवीच्या विविध अवतारांचा हा आध्यात्मिक प्रवास प्रेक्षकांसाठी निश्वितच वेगळा ठरत आहे. अशातच आता म्हाळसा देवीच्या भूमिकेद्वारे घराघरात लोकप्रिय झालेली सुरभी हांडेची या मालिकेत एन्ट्री होणार आहे. ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत सुरभी म्हाळसाच्या भूमिकेत दिसणार आहे. या भागात म्हाळसा देवी आई तुळजा भवानीचे नव्या प्रवासात अनोख्या पद्धतीने स्वागत करताना दिसणार आहे. तुळजा आणि म्हाळसा मिळून दुर्जनानांचा संहार कसा करतील हे बघणं उत्सुकतेचं असणार आहे.

हेही वाचा – Video: मुहूर्त ठरला! ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाड ‘या’ दिवशी अडकणार लग्नबंधनात, मजेशीर व्हिडीओ शेअर करत तारीख केली जाहीर

म्हाळसा या पात्राच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात सुरभी हांडेनं आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. आता ‘आई तुळजाभवानी’ या मालिकेच्या माध्यमातून सुरभी प्रेक्षकांवर छाप पाडायला सज्ज झाली आहे. चेहऱ्यावर भक्तीमय तेज, आकर्षक दागिने, पारंपारिक साडी, प्रभावशाली असं दैवी व्यक्तिमत्त्व म्हाळसाच्या रुपात पाहायला प्रेक्षक उत्सुक आहेत. ‘आई तुळजाभवानी’ मालिकेच्या कथानकाने वेग पकडला असून असुरांपासून भक्तांचे रक्षण करण्यासाठी म्हाळसा तुळजाला पाठिंबा देताना दिसून येईल.

Aai Tulja Bhawani Marathi Serial ( Photo Credit - Colors Marathi )
Aai Tulja Bhawani Marathi Serial ( Photo Credit – Colors Marathi )

सुरभी हांडे म्हणाली, “१० वर्षांने म्हाळसा आता परत सर्वांसमोर येतेय याचा आनंद आहे. म्हाळसाला बघायला प्रेक्षकांना जसं आवडतं तसंच ते पात्र साकारायला मला आवडतं. हे पात्र माझ्यासाठी नेहमीच खास होतं. आता ‘आई तुळजाभवानी’ या पात्राच्या माध्यमातून मला म्हाळसाला न्याय देण्याची एक चांगली संधी मिळाली आहे”.

हेही वाचा – Bigg Boss 18: फराह खान तजिंदर बग्गा-ईशा सिंहवर भडकली, सिद्धार्थ शुक्लाचा केला उल्लेख; नेमकं काय घडलं? जाणून घ्या

पुढे सुरभी म्हणाली,”‘आई तुळजाभवानी’सह म्हाळसा जेव्हा असूरांबरोबर युद्ध करते असा सीन शूट करताना मला वाटतं होतं की, दोन स्त्रीशक्ती कोणाबरोबर तरी लढत आहेत. पूजाबरोबर काम करताना खूप छान वाटलं. तिचंही कौतुक वाटलं. ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत म्हाळसा हे पात्र साकारण्याची संधी दिल्याबद्दल ‘कलर्स मराठी’ आणि बहुरुपी प्रोडक्शनचे आभार”.

Story img Loader