मनोरंजन क्षेत्रात सध्या लग्नाचे वारे सुरु असल्याचं दिसून येत आहे. अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे, तसेच मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत. आता लवकरच स्वानंदी टिकेकर आणि गायक आशिष कुलकर्णी लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. नुकताच स्वानंदी आणि आशिष यांचा केळवणाचा कार्यक्रम पार पडला. या केळवणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारांनी मिळून स्वानंदी आणि आशिषचं केळवण थाटात साजरं केलं. स्वानंदीने आपल्या इन्स्टाग्रामवर या केळवणाचे फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये स्वानंदीबरोबर अभिनेत्री सुकन्या मोने आणि इतर कलाकारही दिसत आहेत. फोटो शेअर करत स्वानंदीने लिहिले की, द काउंटडाउन बिगेन्स!!! केळवणाची सुरुवात तुमच्यापासून झाली आता लाइन लागली आहेच. माझ्या प्रिय व्यक्ती तुमची मी आभारी आहे.हे सर्व माझ्या बाजूने तुम्हांपासून सुरू झाले! सुकन्या मोने, हॅशटॅग दिल्याबद्दल आभारी आहे. स्वानंदीच्या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.
काही महिन्यांपूर्वीच स्वानंदी आणि आशिषचा थाटा साखपुडा संपन्न झाला. आता लवकरच ते विवाहबंधनात अडकणार आहेत. स्वानंदी ही अभिनेते उदय टिकेकर आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर यांची मुलगी आहे. छोट्या पडद्यावरील ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेमुळे ती घराघरांत पोहोचली. त्यानंतर ‘अस्सं माहेर नको गं बाई’, “अगं अगं सुनबाई…” या मालिकेत स्वानंदीने मुख्य भूमिका साकारली होती. तसेच स्वानंदीचा होणार नवरा आशिष कुलकर्णी हा उत्तम गायक आणि गीतकार आहे.