मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. आतापर्यंत नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तिच्या कामाचं नेहमीच कौतुक होत असतं. तिला भेटण्यासाठी तिचे चाहते नेहमीच खूप उत्सुक असतात. आता असाच तिला आलेला फॅन्सचा अनुभव तिने शेअर केला आहे.
तेजश्रीची ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेतून तेजश्रीने दीर्घ काळानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. तिची मालिका आणि तिची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली असून सोशल मीडियावरून त्याला सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत. अशातच आता तेजश्रीने तिच्या आयुष्यातील काही पहिल्या गोष्टी सांगितल्या.
आणखी वाचा : लाखो रुपये फी आकारणाऱ्या तेजश्री प्रधानने पहिल्या मानधनातून खरेदी केली होती ‘ही’ वस्तू, खुलासा करत म्हणाली…
तेजश्रीने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या आयुष्यातील अनेक पहिले अनुभव सांगितले. यावेळी तिने तिच्याकडे फॅन्सनी मागितलेल्या पहिल्या ऑटोग्राफची आठवण शेअर केली.
ती म्हणाली, “मी पहिल्यांदाच चित्रपटाचं शूटिंग करण्यासाठी अमरावतीला गेले होते. तेव्हा त्या गावातली माणसं होती त्यांना मी कोण आहे किंवा काय आहे यापेक्षा एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी एक अभिनेत्री आली आहे हे समजल्यावर त्यांनी माझ्याकडे सही मागितली होती. लहानपणी मी अभिनेत्री व्हायचं की नाही हे ठरवलं नव्हतं. पण वहीची मागची काही पानं मी उद्या अशी सही देत जाईन असं म्हणत त्या सहीने भरली होती. त्यामुळे ती सही मला अमरावतीला पहिल्यांदा करायला मिळाली आणि ती माझ्यासाठी फॅन मोमेंट होती.”