अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेमुळे नेहमी चर्चेत असतात. या मालिकेत तिने साकारलेली मुक्ता, प्रेक्षकांची डोक्यावर घेतली आहे. ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘अग्गंबाई सासूबाई’ प्रमाणेच तेजश्रीच्या ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला देखील प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. एकाबाजूला मालिका सुरू असताना दुसऱ्या बाजूला तेजश्रीचा ‘पंचक’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

५ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या ‘पंचक’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटातील तेजश्रीची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या चित्रपटाच्यानिमित्ताने अभिनेत्री विविध ठिकाणी मुलाखती देताना पाहायला मिळत आहे. नुकतीच तिने ‘मिरची मराठी’ या रेडिओ चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी तेजश्रीने आईच्या निधनानंतरची परिस्थिती सांगितली.

kajol sister tanisha on working woman
“महिलांनी मुलांच्या संगोपनासाठी घरी राहावं”, अभिनेत्री काजोलच्या बहिणीचे वक्तव्य; म्हणाली, “माझी आई आमच्याजवळ…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Myra Vaikul
मायरा वायकूळ रडण्याचा सीन शूट करण्यासाठी काय करायची? म्हणाली, “मी एका जागेवर…”
Meera Jaggnath
ज्याच्यासाठी साखरपुडा मोडला तो मुलगाच…; ‘ठरलं तर मग’फेम मीरा जगन्नाथने केला खुलासा; म्हणाली, “सहा महिन्यांनी…”
karnataka man suicide
Karnataka Suicide: ‘पत्नीने छळ केला’ म्हणत पतीची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये लिहिलं,”तिला माझं मरण हवंय”!
Fatima Sana Shaikh News
Fatima Sana Shaikh : फातिमा सना शेखने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव; “तो माणूस मला म्हणाला, तुला…”
Newlywed women commits suicide after argument with mother in law over using sanitary pads
‘सॅनिटरी पॅड’वरुन वाद झाल्याने नवविवाहित सुनेची आत्महत्या
Tejshree Pradhan
“जे हक्काचे…”, तेजश्री प्रधान ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यावर काय करतेय? म्हणाली, “आताच्या घडीला…”

हेही वाचा – Video: लेकीच्या लग्नातला आमिर खानचा ‘आती क्या खंडाला’ गाण्यावरील डान्स पाहिलात का?, व्हिडीओ झाला व्हायरल

या मुलाखतीमध्ये तेजश्री प्रधानला विचारण्यात आलं की, तू सध्या कोणत्या मनस्थितीत आहेस? यावर तेजश्री म्हणाली, “मी प्रत्येक दिवसाचा त्याच दिवशी विचार करते. एकाच वेळी एक दिवस जगते. कारण सकाळी उठल्यानंतर माझा दिवस कसा असणार आहे? हे मला माहित नसतं. पण या प्रश्नाचं नक्की काय उत्तर देऊ. कारण सगळ्यांचं माहित आहे, नुकतंच मी माझ्या आईला गमावलं. त्यात मालिकेतही त्याचवेळी लग्नाचा ट्रॅक सुरू होता. पण ठीक आहे, एक दिवस चांगला असतो आणि एक दिवस वाईट असतो. एकाच वेळी एक दिवस जगायचा.”

हेही वाचा – अवघ्या तीन महिन्यात ‘या’ लोकप्रिय मालिकेने गाशा गुंडाळला, काल प्रसारित झाला शेवटचा भाग

पुढे तेजश्रीला विचारलं की, “मालिकेतील काही सीनमध्ये अप्रत्यक्षरित्या तुमच्या भावना येऊन जातात; ज्या तुम्हाला कळतं पण नाही. असं होतं का? याविषयी अभिनेत्री म्हणाली, “आता प्रत्येक सीनमध्ये माझ्याबरोबर तसंच होतंय. पण सहकलाकार आणि टीम छान सहकार्य करणारे असतात. मी सध्या या सगळ्यातून जातेय. मालिकेतील माझी आई शुभांगी गोखले ती मला खूप सहकार्य करते. आमचे आई-मुलीचे खूप सीन होतं असतात. या सगळ्यांमध्ये हा महिना माझ्यासाठी काही सोपा नव्हता. पण प्रत्येकाने मला सहकार्य केलं. ‘पंचक’च्या कलाकारांनीसुद्धा मला खूप समजून घेतलं. आपल्या इंडस्ट्रीत म्हटलं जातं, झूठ की दुनिया वगैरे. पण असं काही नाही, हे मी अभिमान सांगेन. इंडस्ट्रीत मानवता आहे, जी मी खूप अनुभवली आहे.”

Story img Loader