अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ही हिंदी मनोरंजनसृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री मानली जाते. केली अनेक वर्ष विविध मालिकांमध्ये उत्तमोत्तम भूमिका साकारत ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. हिंदी टेलिव्हिजनवरील ती सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. आता तिच्याबद्दल एक मोठी माहिती समोर आली आहे.

‘बिग बॉस १५’मध्ये तेजस्वी प्रकाश सहभागी झाली होती. तर या परवाच्या ट्रॉफीवरही तिनेच नाव कोरलं होतं. यानंतर तिला अनेक मालिकांच्या ऑफर्स आल्या. त्यातून तिने एकता कपूरची ऑफर स्वीकारली आणि गेले काही महिने ती तिच्या ‘नागिन ६’ या मालिकेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहे. पण आता तिने या मालिकेतून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला आहे.

prasad jawade reaction on amruta deshmukh enter in maharashtrachi hasyajatra
अमृता देशमुख ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये काम करणार असल्याचं समजताच नवऱ्याला झाला आनंद, अभिनेत्री म्हणाली…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Marathi actress Neelam Shirke Why did leave the acting field
एकेकाळी टॉपला असणारी नीलम शिर्के इंडस्ट्रीपासून का दूरावली? सध्या काय करते? जाणून घ्या…
Marathi actress alka kubal praise to shivali parab for work on mangla movie
“बऱ्याच नायिका मी किती सुंदर…”, अलका कुबल यांनी ‘मंगला’ सिनेमासाठी केलं शिवाली परबचं कौतुक; म्हणाल्या…
Savalyachi Janu Savali Fame Prapti Redkar Dance on angaaron song of pushpa 2 movie
Video: ‘सावळ्याची जणू सावली’ फेम प्राप्ती रेडकरचा ‘पुष्पा २’मधील ‘अंगारो’ गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
manasi moghe marathi actress announces pregnancy
मराठमोळी अभिनेत्री लवकरच होणार आई! नवरा आहे लोकप्रिय हिंदी अभिनेता, २०१३ मध्ये झालेली मिस Diva युनिव्हर्स
Paaru
Video: पारू आदित्यला नवरा मानत असल्याचे सत्य श्रीकांतसमोर येणार? पाहा ‘पारू’ मालिकेचा नवीन प्रोमो

आणखी वाचा : तेजस्वी प्रकाशने घेतला ब्रेकअप करायचा निर्णय, व्हिडीओ पोस्ट करत म्हणाली…

गेल्या वर्षी ‘नागिन ६’ ही मालिका सुरू झाली. या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसादही मिळत होता. पण गेल्या काही महिन्यात या मालिकेचा टीआरपी घसरल्यामुळे निर्मात्यांनी ही मालिकाच बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे. तर अभिनेत्री तेजस्वी प्रकाश देखील या मालिकेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेमध्ये दिसत असून ती या मालिकेतून एग्झिट घेणार आहे. या मालिकेच्या एका एपिसोडसाठी ती तब्बल २ लाख रुपये आकारते. पण अद्याप निर्मात्यांनी ही मालिका बंद होणार असल्याची अधिकृत घोषणा केलेली नाही.

हेही वाचा : अभिनेत्री तेजस्वी प्रकाशचा ‘मन कस्तुरी रे’ चित्रपटातील फर्स्ट लूक प्रदर्शित

एकता कपूरच्या ‘नागिन ६’नंतर ती ‘नागिन ७’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. एप्रिल महिन्यात ही मालिका सुरू होईल असं बोललं जात आहे. तर या मालिकेत प्रमुख भूमिकेसाठी एकताने अभिनेता गुलतेशम याला कास्ट केलं आहे. नुकतेच त्याने स्वतः त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत ही बातमी दिली. पण आता ‘नागिन ६’मधून बाहेर पडल्यावर तेजस्वी ‘नागिन ७’मध्ये दिसणार का, हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल.

Story img Loader