छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या केली आहे. सोनी सब टीव्हीवरील ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ या मालिकेत ती मुख्य भूमिका साकारत होती. मालिकेच्या सेटवरच तिने गळफास लावून जीवन संपवलं. तिच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. वसई पूर्वेच्या कामण येथील एका स्टुडिओमधील प्रसाधनगृहात तिने गळफास लावला. या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात अपमृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाताळच्या पूर्वसंध्येला ही घटना घडल्याने सिनेक्षेत्रात खळबळ उडाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुनिषा २० वर्षांची होती. तिने तिच्या करिअरची सुरुवात इंडस्ट्रीमध्ये बालकलाकार म्हणून केली होती. आतापर्यंत तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. तुनिषा ‘फितूर’, ‘बार बार देखो’, ‘कहानी २: दुर्गा रानी सिंह’, ‘दबंग ३ ‘ यांसारख्या चित्रपटांमध्येही दिसली होती.

हेही वाचा>>“तुझ्याकडून ही अपेक्षा…”, शर्टचे बटण उघडे ठेवून बोल्ड फोटोशूट केल्यामुळे मराठी अभिनेत्री ट्रोल

तुनिषाने आत्महत्या करण्यापूर्वी सहा तासांपूर्वीच सेटवरचा एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये ती सेटवर शूटसाठी मेकअप करताना दिसत होती. सेटवरील या बीटीएस व्हिडीओला तिने ‘स्टे ट्यून’ असं कॅप्शन दिलं होतं. काही तासांपूर्वी तिने स्वत:चा एक फोटोही इन्स्टाग्राम शेअर केला होता. “कामाची आवड असलेल्या व्यक्ती कधीच थांबत नाहीत”, असं कॅप्शन दिलं होतं. तुनिषाने शेअर केलेल्या या व्हिडीओ व फोटोवरुन सगळं काही ठीक आहे, असंच वाटतं होतं. पोस्ट शेअर केल्यानंतर काही तासांतच आत्महत्या केल्याने तिच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे.

हेही वाचा>> कॅप्टन्सी टास्कदरम्यान सदस्यांनी गमावले तब्बल १७ लाख; ‘बिग बॉस मराठी’च्या विजेत्याला मिळणार फक्त ‘इतकी’ रक्कम

हेही वाचा>> लावणी कार्यक्रमांवर बंदीची चर्चा सुरू असतानाच गौतमी पाटीलचा मोठा निर्णय; म्हणाली, “२०२३च्या पहिल्याच दिवशी…”

“तुनिषाने नेमकी आत्महत्या का केली? तसेच तिने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली होती का? त्याचा आम्ही तपास करत आहोत”, अशी माहिती वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांनी दिली.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress tunisha sharma committed suicide shared alibaba dastan e kabul set make up video before few hours kak