‘स्वामिनी’, ‘अग्गंबाई सूनबाई’, ‘योग योगेश्वर जयशंकर’ या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री उमा पेंढारकर ही मनोरंजन विश्वापासून दूर जाऊन न्यूझीलंडला राहायला गेली आहे. तिचा नवरा तिथे स्थायिक असतो. तर आता ती तिच्या यू ट्यूब चॅनलच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येत आहे. तर आता यूट्यूब चॅनलच्या एका व्हिडीओमधून तिने आपला चेहरा नितळ कसा ठेवायचा यासाठी काही टिप्स दिल्या आहेत.
उमा आता मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत नसली तरी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहात मेकअपबद्दल, स्किनकेअरबद्दल, आरोग्य मानसिक आरोग्याबद्दल काही महत्त्वाच्या टिप्स देत असते. तर आता नुकताच तिने एक व्हिडीओ पोस्ट करत चेहरा नितळ आणि पिंपल फ्री कसा ठेवायचा यासाठी काही घरगुती उपाय सांगितले आहेत.
ती म्हणाली की, “जर तुम्हाला ग्लोइंग आणि पिंपल फ्री त्वचा हवी असेल तर रोज रात्री झोपताना हळद दूध प्यायचं. पण हळदीबरोबरच त्या दुधामध्ये एक चमचा गाईचं शुद्ध तूप घालायचं. चवीला हे फारसं छान लागणार नाही पण याचा तुमची त्वचा चांगली ठेवण्यासाठी निश्चितच खूप उपयोग होईल. तर रोज सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळून ते पाणी प्यायचं. याचा वजन कमी करण्यासाठी किती उपयोग होईल हे मी खात्रीने सांगू शकत नाही. पण चेहऱ्यावर एक चमक आणण्यासाठी याचा नक्कीच फायदा होईल.”
हेही वाचा : “पायाजवळ घोणस आली आणि…”; उमा पेंढारकरने सांगितला शूटिंगदरम्यानचा चित्तथरारक अनुभव
तर आता तिने शेअर केलेला हा व्हिडीओ चर्चेत आला असून त्यावर कमेंट करत तिचे चाहते तिला यावर सकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत.