सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी कलाक्षेत्रात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. उर्मिला या सध्या राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या कायमच विविध विषयांवर आपलं मत स्पष्टपणे मांडताना दिसतात. नुकतंच उर्मिला मातोंडकर या ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात सहभागी झाल्या. त्यात त्यांनी त्यांच्या धर्म परिवर्तनाबद्दल भाष्य केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उर्मिला मातोंडकर यांचा विवाहसोहळा २०१६ मध्ये थाटामाटात पार पडला. त्यांनी व्यावसायिक आणि मॉडेल मोहसिन अख्तर मीरशी लग्न केलं. या कार्यक्रमात अवधूत गुप्तेने उर्मिला यांनी त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल आणि धर्म परिवर्तनाबद्दल प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिले.
आणखी वाचा : Video : “राज ठाकरे की उद्धव ठाकरे? महाराष्ट्र जास्त समर्थपणे कोण सांभाळू शकतं?” उर्मिला मातोंडकर म्हणतात…

“मी माझे पती मोहसिन यांना फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राच्या भाचीच्या लग्नात पहिल्यांदा भेटले होते. तिथे आमची नाचताना ओळख झाली. कारण हे महाशय इतक्या जोरजोरात नाचत होते की त्यांनी मला चुकून धक्का दिला. त्यानंतर त्याच्या मित्राने त्याला सांगितलं की अरे तू किमान सॉरी तरी म्हणं. त्यानंतर मग तो स्वत: जरा गोंधळला आणि मग त्याने मला येऊन सॉरी म्हटलं. त्यानंतर आम्ही चांगले मित्र झालो. आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला,” असं उर्मिला यांनी सांगितलं.

यानंतर अवधूतने उर्मिलाला जेव्हा तुमचं लग्न झालं त्यानंतर तुम्ही धर्म परिवर्तन केल्याचं म्हटलं गेलं होतं, असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, “माझ्या नवऱ्याने किंवा त्याच्या कुटुंबाने मला कधीही धर्म बदलण्यासाठी सांगितलं नाही. आम्ही दोघंही एकमेकांच्या धर्माचा कायमच आदर करतो.”
आणखी वाचा : “तुम्ही लग्नासाठी इस्लाम धर्म स्वीकारला का?” उर्मिला मातोंडकर म्हणाल्या “माझ्या नवऱ्याने…”

“मी नेहमीच हिंदू होते आणि असेन. मी माझा धर्म बदलला नाही. मला नेहमीच या सगळ्या गोष्टींमुळं ट्रोल केलं जातं, हे सगळं विचित्र आहे”, असं उर्मिला मातोंडकर यांनी सांगितले.

आणखी वाचा : “…तर मी दोन मुलांची आई असते”, केतकी चितळेच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली “वयाच्या चौथ्या वर्षी…”

दरम्यान उर्मिला यांनी वयाच्या ४२ व्या वर्षी काश्मिरी व्यापारी आणि मॉडेल मोहसिन अख्तरसोबत लग्न केले. उर्मिलाने २०१६ मध्ये कोणालाही पूर्व कल्पना न देता लग्न केलं. मोहसिन हा तिच्याहून १० वर्षाने लहान आहे. त्या दोघांची भेट मनीष मल्होत्रामुळे झाली. मोहसिन हा कपड्यांचा व्यावसायिक आहे. एवढंच नाही तर झोया अख्तरच्या ‘लक बाय चान्स’ चित्रपटात त्याने अभिनयही केला आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress urmila matondkar talk about accept islam religion after married mohsin akhtar nrp