मराठी गायक, संगीतकार अवधूत गुप्तेचा टॉक शो ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या कार्यक्रमात आतापर्यंत राज ठाकरे, संजय राऊत, नारायण राणे असे तीन दिग्गज राजकीय व्यक्ती सहभागी झाले आहेत. आता येत्या भागात अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकतंच अवधूत गुप्तेने उर्मिला मातोंडकर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओ त्या ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : Video : “राज ठाकरे की उद्धव ठाकरे? महाराष्ट्र जास्त समर्थपणे कोण सांभाळू शकतं?” उर्मिला मातोंडकर म्हणतात…

या व्हिडीओत अवधूत गुप्ते हा उर्मिला मातोंडकरांबरोबर रॅपिड फायर खेळताना दिसत आहे. यावेळी अवधूत गुप्ते हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबद्दल प्रश्न विचारताना दिसत आहे.

आणखी वाचा : “…आणि आज दिपा स्टार आहे”, केदार शिंदेची ‘ती’ पोस्ट चर्चेत; म्हणाले “अंकुश चौधरी…”

या दोघांचे फोटो दाखवत अवधूत गुप्तेने “यातील कोणता नेता साधा माणूस वाटतो? राहुल गांधी की नरेंद्र मोदी?” असे विचारले. त्यावर उर्मिला मातोंडकर यांनी “हा प्रश्न काय आहे”, असे म्हटलं. त्यानंतर त्या खळखळून हसल्या. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress urmila matondkar talk about pm narendra modi and rahul gandhi khupte tithe gupte show nrp