सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी कलाक्षेत्रात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. उर्मिला या सध्या राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या कायमच विविध विषयांवर आपलं मत स्पष्टपणे मांडताना दिसतात. झी मराठीच्या ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाच्या येत्या भागात उर्मिला मातोंडकर सहभागी झाली होती. नुकतंच उर्मिला मातोंडकरने अभिनेत्री कंगना रणौतबद्दल भाष्य केले आहे.

बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत आणि उर्मिला मातोंडकर यांच्या अनेकदा वादाची ठिणगी पडली आहे. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर कंगनाने बॉलिवूडवर निशाणा साधला होता. त्यानंतर उर्मिला मातोंडकरने कंगनाबद्दल विविध प्रतिक्रिया दिल्या होत्या. आता अभिनेता अवधूत गुप्तेने ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमादरम्यान तिला प्रश्न विचारला. त्यावर तिने खास उत्तर दिले आहे.
आणखी वाचा : Video : “राज ठाकरे की उद्धव ठाकरे? महाराष्ट्र जास्त समर्थपणे कोण सांभाळू शकतं?” उर्मिला मातोंडकर म्हणतात…

एका नटीबरोबरच्या भांडणामध्ये महाराष्ट्रातील राजकारण्यांनी तुमची बाजू घेतली नाही? असा प्रश्न अवधूत गुप्तेने उर्मिलाला विचारला. त्यावर उर्मिलाने सडेतोड उत्तर दिलं.

“काही राजकारणी जे स्वत:ला नेते समजतात, अशा लोकांनी मात्र दुसरीकडेच बघायला सुरुवात केली. कारण मला असं वाटतं की, आपल्या मातीतली, प्रदेशातील आपली व्यक्ती तिच्यावर जेव्हा इतके भयानक, गलिच्छ, खालच्या दर्जाची गोष्ट बोलली जाते, तेव्हा हे त्यांचं कर्तव्य असतं. माझ्यासारख्या व्यक्तीकरता उभं न राहणारी लोक काय सामान्या लोकांकरिता उभं राहणार”, असे उर्मिला मातोंडकरने म्हटले.

आणखी वाचा : “माझा आता कोणताही संबंध नाही…” ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरने दिला राजीनामा

दरम्यान झी मराठीने उर्मिला मातोंडकर सहभागी झाल्याचे अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. हे व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहेत. यावेळी उर्मिला मातोंडकर यांनी अनेक राजकीय विषयांसह खासगी विषयांवरही भाष्य केले.

Story img Loader