सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी कलाक्षेत्रात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. उर्मिला या सध्या राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या कायमच विविध विषयांवर आपलं मत स्पष्टपणे मांडताना दिसतात. आता उर्मिला मातोंडकर या खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. नुकतंच याचा एक प्रोमो समोर आला आहे.
मराठी गायक, संगीतकार अवधूत गुप्तेचा प्रसिद्ध टॉक शो ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या कार्यक्रमात राज ठाकरे, संजय राऊत, नारायण राणे असे तीन दिग्गज राजकीय व्यक्ती सहभागी झाले आहेत. आता येत्या भागात या कार्यक्रमात अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर सहभागी होणार आहेत.
आणखी वाचा : “मी मात्र…” उर्मिला मातोंडकरांच्या वाढदिवशी पतीने पोस्ट करत दिला खास सल्ला
नुकतंच अवधूत गुप्तेने या कार्यक्रमाचा एक प्रोमो व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत अवधूत गुप्ते हा उर्मिला मातोंडकरांबरोबर रॅपिड फायर खेळताना दिसत आहे. यावेळी अवधूत गुप्ते “कोणते ठाकरे महाराष्ट्र जास्त समर्थपणे सांभाळू शकतात? राज ठाकरे की उद्धव ठाकरे?” असा प्रश्न उर्मिला यांना विचारतो.
आणखी वाचा : “…आणि आज दिपा स्टार आहे”, केदार शिंदेची ‘ती’ पोस्ट चर्चेत; म्हणाले “अंकुश चौधरी…”
त्यावर उर्मिला मातोंडकर या हसत हसत उत्तर देतात. त्यावेळी त्या “एकत्रित दोघेही सिम्पल” असे म्हणतात. त्यावर अवधूत गुप्ते जोरजोरात हसतो. सध्या हा प्रोमो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.