‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील सर्वच विनोदवीर हे सतत चर्चेत असतात. याच कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे वनिता खरात. तिचा चाहतावर्गही मोठा आहे. वनिता खरातचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तिचा पती सुमित लोंढेने तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

वनिताने नाटकांपासून तिच्या अभिनयक्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. मेहनतीच्या जोरावर तिने बॉलिवूडपर्यंत मजल मारली. काही महिन्यांपूर्वीच वनिता लग्नबंधनात अडकली. नुकतंच सुमितने वनितासाठी खास पोस्ट केली आहे.
आणखी वाचा : “माझे वडील…”, रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर होणाऱ्या ट्रोलिंगवर गश्मीर महाजनीची पोस्ट, म्हणाला…

सुमितने इन्स्टाग्रामवर त्यांच्या लग्नातील काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ते दोघेही गोड हसताना दिसत आहेत. सुमितला सध्या वनिताची खूप आठवण येत असल्याचेही दिसत आहे.

आणखी वाचा : प्रत्येकीला वेगळा रंग, ब्लाऊजवर विशिष्ट संदेश अन्…; ‘बाईपण भारी देवा’मधील ‘मंगळागौर’ गाण्यासाठी वापरलेल्या साड्यांची ‘ही’ आहे खासियत

“माझ्या जीवनात आनंद आणणाऱ्या व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. लव्ह यू वनी. तुझे यापुढील दिवस, वर्ष आणि आयुष्य खूप चांगले जावो. तुझी खूप आठवण येतेय. लवकर परत ये”, असे सुमितने या फोटोला कॅप्शन देताना म्हटले आहे.

दरम्यान सुमितच्या या पोस्टवर वनितानेही कमेंट केली आहे. माझेही तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे, असे वनिताने म्हटले आहे. सध्या वनिता ही महाराष्ट्राची हास्यजत्राच्या संपूर्ण टीमबरोबर अमेरिकेत गेली आहे. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओही समोर आले आहेत.

Story img Loader