मराठीमधील बऱ्याच अभिनेत्री आपलं काम सांभाळत व्यवसाय करत आहेत. क्रांती रेडकर, प्राजक्ता माळी, अभिज्ञा भावे अशा काही अभिनेत्रींनी व्यावसायिका म्हणून काम सुरू केलं. आता यामध्ये आणखी एका अभिनेत्रीची बहुदा भर पडणार आहे. मराठी मालिक व ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वामुळे नावारुपाला आलेली अभिनेत्री वीणा जगताप एक नवी सुरुवात करणार आहे.
आणखी वाचा – “आता त्या व्यक्तीचं तोंडही बघणार नाही” ‘बिग बॉस १६’चं विजेतेपद मिळाल्यानंतर कोणावर भडकला एमसी स्टॅन?
अभिनेत्री वीणा जगतापने नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे तिने मी एक नवी सुरुवात करत आहे असं म्हटलं आहे. पण या पोस्टबरोबरच वीणाने शेअर केलेला फोटो विशेष लक्षवेधी ठरत आहे. या फोटोमध्ये वीणा एका मुलीला मेकअप करताना दिसत आहे.
आणखी वाचा – “खूप मेहनत घेतो पण…” समीर चौघुलेंच्या वडिलांनी व्यक्त केली ‘ती’ खंत, म्हणाले, “आमचं एकमेकांशी…”
वीणाच्या या पोस्टवरुन ती आता मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करणार का? असा प्रश्न चाहते विचारत आहेत. “तू मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करणार का?” असा प्रश्न एका चाहतीने वीणाला विचारला. यावर वीणाने कमेंट्सच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. वीणा म्हणाली, “अजूनतरी मी मेकअप आर्टिस्ट झालेली नाही. पण नवीन काहीतरी प्रयोग करण्यामध्ये काय वाईट आहे?”
वीणाच्या या कमेंटमधून ती मेकअप आर्टिस्ट म्हणून स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करू इच्छित आहे असं दिसून येतं. “किसी को घर से निकलते ही मिल गई मंज़िल, कोई हमारी तरह उम्र भर सफ़र में रहा. मी माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहे. मी आशा करते की हा नवा प्रवास चांगला असेल.” असं वीणाने पोस्ट शेअर करत म्हटलं.