मराठमोळी अभिनेत्री वीणा जगताप ‘राधा प्रेम रंगी रंगली’ मालिकेतून घराघरात पोहोचली. ‘आई माझी काळुबाई’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. वीणा आगामी प्रोजेक्ट, करिअरप्रमाणेच वैयक्तिक आयुष्याबाबतही सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसते.वीणाचा चाहता वर्गही मोठा आहे. सोशल मीडिवरुन ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात वीणा सहभागी झाली होती. या पर्वाचा विजेता ठरलेल्या शिव ठाकरेबरोबर वीणाचं नाव जोडलं गेलं होतं. शिव व वीणा अनेक दिवस रिलेशनशिपमध्ये होते. अनेक कार्यक्रमांमध्ये ते एकत्र दिसलेही होते. परंतु, काही कारणांमुळे त्यांच्यात ब्रेकअप झालं. शिव ‘बिग बॉस हिंदी’च्या सोळाव्या पर्वातही सहभागी झाला होता. या पर्वाचा तो रनर अप ठरला आहे. ‘बिग बॉस’च्या घरातही अनेकदा वीणाचं नाव घेतलं गेलं. शिवाय वीणाने शिवसाठी पोस्टही केली होती.

हेही वाचा>> कार्तिक आर्यनचा ‘शहजादा’ शाहरुख खानच्या ‘पठाण’ला देणार टक्कर? प्रदर्शनापूर्वीच ‘इतक्या’ कोटींची कमाई

हेही वाचा>> नताशा स्टँकोविकसह दुसऱ्यांदा लग्न केल्याने हार्दिक पांड्या ट्रोल, नेटकरी म्हणाले “स्वत: हिंदू असून…”

आता वीणाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. वीणा या फोटोमध्ये एका महिलेचा मेकअप करताना दिसत आहे. या पोस्टवर शिव ठाकरेचं नाव घेत चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. “शिव आणि वीणाचं जमलं पाहिजे” अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने “शिव व वीणा मस्त कपल आहेत” असं म्हटलं आहे. “मला वाटतं शिव तुमची वाट बघत आहे”, असंही एकाने कमेंटमध्ये म्हटलं आहे. तर एका नेटकऱ्याने “शिव ठाकरेसाठी पोस्ट का नाही केली” अशी कमेंट केली आहे.

हेही वाचा>> “रितेशपासून दूर राहा” पहिल्या पतीबाबत कमेंट करणाऱ्याला राखी सावंतचं उत्तर, म्हणाली “तो माझा…”

वीणाने शेअर केलेल्या फोटोला “किसी को घर से निकलते ही मिल गई मंजिल…कोई हमारी तरह उम्र भर सफ़र में रहा” असं कॅप्शन दिलं आहे. वीणा लवकरच तिच्या नव्या इनिंगला सुरुवात करत आहे. मेकअप आर्टिस्ट म्हणून वीणा काम करणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress veena japtap shared post netizens comment on shiv thakare kak