महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून विशाखा सुभेदारला ओळखले जाते. ती कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. विशाखा सुभेदार ही सध्या तिच्या ‘कुर्रर्रर्रर्र’ या नाटकामुळे चर्चेत आहेत. विशाखा सुभेदारने मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. एक उत्तम कॉमेडियन म्हणून तिला ओळखले जाते. नुकतंच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
विशाखा सुभेदार ही इन्स्टाग्रामवर नेहमीच सक्रीय असते. ती कायमच विविध पोस्ट शेअर करताना दिसते. नुकतंच विशाखा सुभेदारने इन्स्टाग्रामवर एक रिल शेअर केला आहे. या रिलमध्ये त्या एका जुन्या गाण्यावर व्हिडीओ शेअर करताना दिसत आहे. या व्हिडीओला त्यांनी हटके कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडल्यानंतर पुढे काय करणार? विशाखा सुभेदारने केला खुलासा
“तुम समझ नही आती ‘म्हणणाऱ्या सगळ्या पुरुषांना एकच सांगायचं आहे… तितकी समज तुमच्यात नाहीय, पण खरच कोणीही कोणाला समजुन घेण्यापेक्षा उमजून घेणे गरजेचे आहे. हा तोच फरक आहे, जो ऐकणे आणि लक्षपूर्वक ऐकणे हया शब्दांत जो फरक आहे, असे त्यांनी हा व्हिडीओ शेअर करताना म्हटले आहे.
आणखी वाचा : “एखादी जाडी बाई…” विशाखा सुभेदारने व्यक्त केली खंत
विशाखा सुभेदारच्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. ‘खूप छान’, ‘सुंदर’, ‘मस्त’ अशा अनेक कमेंट विशाखा सुभेदार यांच्या पोस्टवर पाहायला मिळत आहे.
दरम्यान विशाखा सुभेदार यांनी ‘फु बाई फू’ आणि ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या कॉमेडी शोमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून ती घराघरात पोहोचली. विशाखा सुभेदार यांनी आतापर्यंत ‘फक्त लढ म्हणा’ (२०११), ‘४ इडियट्स’ (२०१२) आणि ‘अरे आवाज कोनाचा’ (२०१३) अशा काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सध्या त्या कुर्रर्र या नाटकात काम करत आहे.