अभिनेत्री विशाखा सुभेदार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘फुबाईफू’ या छोट्या पडद्यावरील विनोदी कार्यक्रमांतून घराघरांत पोहोचली. विनोदाचं उत्तम टायमिंग आणि दमदार अभिनयाच्या जोरावर विशाखाने प्रेक्षकांची मनं जिंकली. मालिका, चित्रपट, विनोदी कार्यक्रम अशा सगळ्या माध्यमांवर तिने तिच्या अभिनयाची छाप पाडली आहे. विशाखा सुभेदारने नुकत्याच एक वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले. या वेळी अभिनेत्रीने तिला सिग्लवर भेटलेल्या तृतीयपंथीयांचा भावनिक किस्सा सांगितला. नेमकं काय घडलं जाणून घेऊयात…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “आता धरती मातेचं काय होईल?” वजनावरून डिवचणाऱ्यांना विशाखा सुभेदारचं सडेतोड उत्तर म्हणाली, “आहे वजनदार पण…”

विशाखा सुभेदारला आयुष्यात कोणता प्रसंग तुझ्या कायम लक्षात राहील असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिनेत्री म्हणाली, “एके दिवशी माझं माझ्या घरी भांडण झालं होतं. तेव्हा नुकतीच मी नवीन गाडी खरेदी केली होती, गाडी घेऊन मी निघाले. घरी झालेल्या भांडणामुळे माझ्या डोळ्यात पाणी होतं आणि माझी पर्स सुद्धा मी घरी विसरले होते. एवढ्यात समोर सिग्नलवर उभ्या असलेल्या एका तृतीयपंथीयाने मला पाहिलं आणि ‘पैसा दे पैसा दे…’ असं म्हणत तो माझ्याजवळ आला. गाडीची काच खाली करून मी त्याला ‘अरे पर्स नहीं लाया भूल गयी’ असं सांगितलं.”

हेही वाचा : नकारात्मक भूमिका असतानाही ‘प्रेमाची गोष्ट ‘मालिकेला होकार का दिला? अपूर्वा नेमळेकर म्हणाली, “बिग बॉसनंतर मी…”

अभिनेत्री पुढे म्हणाली, “गाडीची काच खाली करून रडलेल्या अवस्थेत माझ्याकडे पैसे नसल्याचं मी सांगितलं. तेव्हा त्या तृतीयपंथीयाने माझ्या डोळ्यात पाणी पाहिलं अन् म्हणाला, ‘चल कुछ नहीं तेरे आँखो मैं जो ऑंसू है वो मुझे दे…’ त्या क्षणाला मी खुदकन हसले आणि पुढे निघाले. माझ्याबद्दल काहीतरी आपुलकी वाटल्याशिवाय त्याने मला असं उत्तर दिलं नसतं. एक माणूस म्हणून आलेला हा अतिशय सुंदर अनुभव होता. जो माझ्या कायम लक्षात राहणार.”

हेही वाचा : चांगला नेता कोण? ‘खुपते तिथे गुप्ते’च्या मंचावर सुप्रिया सुळे यांचा खुलासा; जालन्यातील घटनेवरही केलं भाष्य

दरम्यान, अभिनेत्री विशाखा सुभेदार सध्या ‘शुभविवाह’ या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहे. तिने साकारलेल्या खलनायिकेच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress vishakha subhedar shared incidence of her personal life and interaction with transgender sva 00