‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिका घराघरात पाहिली जातेय. झी मराठी वाहिनीवरील या मालिकेने प्रेक्षकांना जणू भुरळच घातली आहे. यातलं अधिपती आणि अक्षराचं पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलंय. झी मराठी वाहिनीवरील सर्वाधिक टीआरपी असलेली ही मालिका ठरली आहे. त्यात आज १ एप्रिल म्हणजेच एप्रिल फूल. यानिमित्ताने अधिपती आणि अक्षराचा एक खास व्हिडीओ झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
सध्या इंटरनेटवर ‘आज काय बनवू’, ‘जेवायला काय बनवू’ या ट्रेंडचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अशातच अधिपती आणि अक्षरानंसुद्धा हा ट्रेंड फॉलो करायचं मनावर घेतलं. या व्हिडीओत अक्षरा अधिपतीला विचारते, “अधिपती आज काय बनवू? यावर अधिपती म्हणतो, एप्रिल फूल सोडून काहीही बनवा.” या व्हिडीओला ‘नको देवराया अंत आता पाहू’ हे गाणं जोडलं गेलंय. “अधिपती आज मार खाणार”, असे कॅप्शन या व्हिडीओला दिले आहे.
अधिपती आणि अक्षराचा हा एप्रिल फूल व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तर या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. “ट्रेंडचा विजेता” असं एकाने कमेंट करत लिहिलं. तर, “दोघांची जोडी खूप छान आहे, असेच रील बनवत राहा आणि आम्हाला हसवत राहा”, असं दुसर्याने कमेंट करत लिहिलं.
हेही वाचा… ‘देवमाणूस’फेम ‘ही’ अभिनेत्री आता करतेय आयपीएलचे सूत्रसंचालन; जाणून घ्या…
दरम्यान, अधिपती आणि अक्षरा अभिनीत ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेबाबत सांगायचं झालं, तर ही मालिका आता रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. सासू भुवनेश्वरी आणि सून अक्षरा यांच्यातल्या मतभेदामुळे अधिपतीला अजून काय काय सहन करावं लागणार ते येणाऱ्या भागांत प्रेक्षकांच्या समोर येईल.