ड्रामा क्वीन राखी सावंतचा पूर्वाश्रमीचा पती आदिल खान गेल्या काही दिवसांपासून दुसऱ्या लग्नामुळे खूप चर्चेत आला आहे. ३ मार्चला आदिल खानने ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री सोमी खानशी गुचपूच लग्न केलं होतं. दोघांच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सगळ्या चाहत्यांना धक्का बसला होता. सध्या आदिल व सोमी विविध एंटरटेनमेंट चॅनलला मुलाखती देताना दिसत आहेत. अशातच एका मुलाखतीमध्ये राखीने पत्नी सोमीला दिलेला सल्ला ऐकून आदिल भडकला आणि त्याने सडेतोड उत्तर दिलं आहे.
आदिल खानने पत्नी सोमीसह ‘टेलीमसाला’ या एंटरटेनमेंट चॅनलला नुकतीच मुलाखत दिली. यावेळी सोमीला विचारलं गेलं की, राखीने आदिलपासून सोमीला वाचवा, असं वक्तव्य केलं आहे. यावर तुझं मत काय? सोमी म्हणाली, “माझ्यासाठी हे महत्त्वाचं नाहीये. मला याबाबत काहीच माहित नाही. त्यामुळे मी यावर अजिबात बोलू इच्छित नाही. पण सर्वात जास्त कोणाबरोबर चांगलं वाटतं, सुरक्षित वाटतं तर ते माझ्या नवऱ्याबरोबर.”
हेही वाचा – लग्नानंतर सिद्धार्थ चांदेकरमध्ये काय बदल झाले? म्हणाला, “मला अपयशी…”
त्यानंतर आदिल खान म्हणाला, “राखी असं काही बोलली नाही तर फारच बरं होईल. राखीपासून पहिल्यांदा जग वाचू दे ही खूप मोठी गोष्ट आहे. सोमीला तर मी वाचवेन, सोमी माझ्याबरोबर सुरक्षित आहे. राखी करोना व्हायरससारखी आहे. तिच्यापासून फक्त जग वाचू दे. मुंबई, भारत खूप शांत आहे. तिने कुठेतरी दूर निघून जावं आणि तिथेच स्थायिक व्हावं. यामुळे लोकं इथे सुखी राहतील.”
हेही वाचा – सिद्धार्थ चांदेकर सावत्र वडिलांना बाबा नव्हे तर ‘या’ नावाने मारतो हाक; म्हणाला, “त्यांना मी हे नातं…”
दरम्यान, आदिल खानची दुसरी पत्नी सोमी अभिनेत्री असून तिने ‘न्याय: द जस्टिस’, ‘केसरिया बालम’ आणि ‘हमारा हिंदुस्तान’ यांसारख्या मालिकेत काम केलं आहे. याशिवाय सोमी ‘बिग बॉस १२’मध्ये झळकली होती.