ड्रामा क्वीन राखी सावंत आणि आदिल खान दुर्रानी यांनी मागच्या वर्षी लग्न केलं. त्यानंतर काही महिन्यातच दोघांची भांडणं होऊ लागली. राखीने आदिल खानवर फसवणुकीचे, मारहाणीचे गंभीर आरोप केले आणि त्याच्याविरोधात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी आदिल खानला अटक केली. काही महिने तुरुंगात राहिल्यानंतर आदिल खानची सुटका झाली. राखी व आदिलच्या घटस्फोटाच्याही चर्चा आहेत. अशातच आदिलला राखीला माफ करण्याबद्दल विचारण्यात आलं.
नुकतंच आदिलला खानला विचारण्यात आलं की तू राखीला माफ करशील का? त्यावर आदिलने स्पष्ट नकार दिला. ‘इन्स्टंट बॉलीवूड’शी बोलताना तो म्हणाला, “मी राखीला कधीच माफ करणार नाही. तिने माझ्याबरोबर जे केलं ते खूप अती होतं. ती जर गप्प बसली असती तर एकवेळ मी तिला माफ करण्याचा विचारही केला असता. पण अजुनही ती माझी, माझ्या कुटुंबाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत आहे. तिला शक्य त्या सर्व वाईट गोष्टी ती माझ्याबद्दल करण्याचा प्रयत्न करतेय. राखी माफीलायक नाही, ती खूप वाईट आहे. तिने माझं आयुष्य आणि करिअर दोन्ही बरबाद करण्याचा प्रयत्न केला. मी लोकांच्या प्रेमामुळे अजुनही जिवंत आहे, नाहीतर कधीच मेलो असतो, असं त्याने सांगितलं.
या व्हिडीओवर राखी सावंतने कमेंट्स केल्या आहेत. “तो लोकांना स्वतःच्या फायद्यासाठी वापरतो. त्याने माझा वापर केला, आता तो शर्लिन चोप्रा व राजश्रीचा वापर करत आहे. तुम्ही या व्यक्तीबरोबर माझं नाव घेऊ नका, माझा त्याच्याशी काहीच संबंध नाही. हा वाईट माणूस आहे, माझं नाव वापरणं बंद कर” असं राखीने कमेंटमध्ये लिहिलं.
दरम्यान, राखी व आदिल दोघेही एकत्र ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. राखी व आदिल एकत्र बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश करणार आहेत, असं म्हटलं जात आहे. पण राखी व आदिल दोघांनीही याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.