कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल तर कधी तिच्या वक्तव्यांमुळे ती चर्चेत असते. तिने गेल्यावर्षी आदिल खान दुर्रानीशी लग्न करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. लग्नानंतर काही वेळातच राखीने आदिलवर अनेक गंभीर आरोप केले होते आणि पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी आदिलला अटक केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आदिल ६ महिन्यांची शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर आला आहे. बाहेर येताच आदिलने राखी सावंतवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. आदिलने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की राखीने ड्रग्स देऊन त्याचा न्यूड व्हिडीओ शूट केला होता. इतकेच नाही तर त्याने राखीबाबत अनेक खुलासे केले आहेत.

Video: आदिल खान सहा महिन्यांनी तुरुंगातून बाहेर, राखी सावंतला दिला इशारा; म्हणाला, “माझ्याबरोबर जे घडलं…”

आदिल खान ‘बॉलीवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, “राखीसारख्या महिलेशी बोलणंही खूप धोकादायक आहे. राखीने मला एक गोळी दिली. तिने मला ड्रग्ज दिले होते. यानंतर तिने व्हिडीओ कॉलवर न्यूड व्हिडीओ बनवला. तेव्हा मी बाहेर होतो आणि ती मुंबईत होती. राखीने रितेशला घटस्फोट दिलेला नाही आणि माझ्याशी लग्न केलं. राखी माझ्यापेक्षा १९ वर्षांनी मोठी आहे. मी तिच्यावर खूप प्रेम केलं, तिच्या आईवरही प्रेम केलं. मी त्याच्या आईची आवडती व्यक्ती होतो.”

“मी सिगारेट ओढत होतो अन्…”, सुबोध भावेने मंजिरीला रक्ताने लिहिलेलं पत्र; खुलासा करत म्हणाला…

मीडियाशी बोलताना राखीने तिचा गर्भपात झाल्याचे सांगितले होते. आता यावर आदिल खुलासा करत म्हणाला, “ती गर्भवती कशी असू शकते. तिला काही समस्या होत्या. त्यानंतर तिचे ऑपरेशन करून गर्भाशय काढण्यात आले. मी स्वतः तिला रुग्णालयात भर्ती केले होते. मी तिच्यासोबत हॉस्पिटलमध्ये असताना मला पोलिसांनी अटक केली होती.”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adil khan durrani says rakhi sawant made his nude video after giving drugs to him hrc