राखी सावंतचा पती आदिल खान दुर्रानी सहा महिन्यांनी तुरुंगातून बाहेर आला आहे. कोर्टाने त्याला जामीन दिल्यानंतर आदिल आज त्याच्या वकिलाबरोबर माध्यमांसमोर आला. त्याने पत्रकार परिषद घेत राखीने केलेल्या आरोपांना उत्तर दिलं. तसेच राखीने आपली फसवणूक केल्याचंही म्हटलं आहे. राखीने पहिल्या पतीपासून घटस्फोट न घेताच आपल्याशी लग्न केल्याचा दावा आदिलने केला आहे.

आदिल म्हणाला, “राखी मीडियासमोर कायम खोटं बोलायची. आमचं लग्न झालं होतं, तरी ती माध्यमांसमोर म्हणायची की आदिलला विचारा तो लग्न कधी करणार. आमचं लग्न झालं होतं, तरीही ती तशी बोलायची, त्यामुळे मी माध्यमांसमोर खोटं बोलू शकत नव्हतो. सलमान खानने फोन केला, सलमान खान माझं कन्यादान करायला तयार आहे, बिग बॉसमध्ये लग्न करायचं हे सगळं ती बोलू लागली. तो सगळा ड्रामा होता. मी कधीच सलमान खानला भेटलो नाही, त्यांच्याशी भेटलोही नाही.”

salman khan did not select in vivah movie
‘विवाह’मध्ये सलमान खानऐवजी शाहिद कपूरला का घेतलं होतं? दिग्दर्शक म्हणाले, “त्या भूमिकेसाठी निरागसपणा…”
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Santosh Deshmukh Brother Dhananjay Deshmukh
Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुख यांचा मोठा खुलासा, “त्यादिवशी आरोपी आणि एपीआयचं चहाचं बिल मीच दिलं, त्यानंतर त्याने…”
kareena kapoor
हल्ल्यानंतर सैफ अली खान आणि करीनाने मुलांसाठी घेतला मोठा निर्णय; पापाराझींना केली ‘ही’ विनंती
kareena kapoor angry on paparazzi post
“हे सगळं थांबवा”, पती रुग्णालयात अन् मुलांबद्दलची ‘ती’ पोस्ट पाहून करीना कपूर खान संतापली; म्हणाली, “आम्हाला एकटं सोडा…”
Bharat Gogawale
Bharat Gogawale : पालकमंत्रीपदावरून डावलल्यानंतर भरत गोगावलेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जिल्ह्यातलं वातावरण…”
Anand Dave on Saif Ali khan
“तैमुर नावामुळे सैफवर हल्ला झाला असता तर आम्हाला…”, जितेंद्र आव्हाडांवर टीका करताना आनंद दवे यांचं विधान

“राखीने मला ड्रग्ज दिले”, आदिल खानचा धक्कादायक दावा; म्हणाला, “माझा न्यूड व्हिडीओ…”

राखी पहिल्या पतीच्या संपर्कात असल्याचा खुलासा आदिलने केला. “गेल्या वर्षी दिवाळीत एका शोसाठी राखी लंडनला गेली होती. आम्ही एकत्र निघालो होतो, मी दुबईला गेलो आणि ती लंडनला गेली होती. तिथून ती दुबईला आल्यावर मला कळालं की ती तिचा पहिला पती रितेशबरोबर संपर्कात होती. त्यांचं बोलणं व्हायचं. मी बऱ्याचदा तिच्या फोनच्या स्क्रीनवर मेसेज व कॉल्स नोटिफिकेशन पाहिले होते. त्यानंतर राखी मराठी बिग बॉसमध्ये गेली. ती गेल्यानंतर मी चौकशी करू लागलो,” असं त्याने सांगितलं.

Video: आदिल खान सहा महिन्यांनी तुरुंगातून बाहेर, राखी सावंतला दिला इशारा; म्हणाला, “माझ्याबरोबर जे घडलं…”

“मी राखी व रितेशचं बोलणं ऐकलं. त्यात रितेश राखीला म्हणाला होता की ‘मी तुझ्याबरोबर युकेमध्ये जे ८-१० दिवस घालवते, ते माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होते. आपण एकत्र राहत होतो तेव्हा तू इतकी रोमँटिक नव्हतीस’. हे ऐकल्यानंतर मला काहीच सुचत नव्हतं, तिच्याशी काय बोलावं हेही मला कळत नव्हतं. मी तिचा पती असूनही हे सगळं काय चाललंय हे विचारायची माझी हिंमत होत नव्हती,” असं आदिल म्हणाला.

“मी सिगारेट ओढत होतो अन्…”, सुबोध भावेने मंजिरीला रक्ताने लिहिलेलं पत्र; खुलासा करत म्हणाला…

“मी राखीच्या लग्नाबद्दल माहिती गोळा करायला सुरुवात केली. त्यानंतर मला कळालं की राखीचं रितेशशी लग्न झालं होतं. तिने मला आणि मीडियाला खोटं सांगितलं होतं की रितेश पळून गेला होता आणि त्यांचं लग्न झालं नव्हतं. ती जे बोलायची तो सगळा ड्रामा होता. तिने कायदेशीररित्या रितेशशी लग्न केलं होतं आणि त्याच्यापासून घटस्फोट न घेताच माझ्याशी लग्न केलं होतं. आम्ही लग्न केलं तेव्हा अंधेरी कोर्टात गेलो होतो, तेव्हा तिने ती सिंगल असल्याचं म्हटलं होतं. मीही त्यावर विश्वास ठेवला होता, कारण माझ्याकडे काहीच पुरावा नव्हता. राखी सावंतवर विश्वास ठेवणं ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती”, असं आदिल म्हणाला. यावेळी त्याने राखी व रितेशच्या लग्नाचे फोटो दाखवले व कायदेशीर पुरावेही दिले. दोघांनी ११ नोव्हेंबर २०१९ मध्ये लग्न केलं होतं, असंही आदिलने सांगितलं.

Story img Loader