Paani Movie Premier : ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राची निर्मिती असलेला ‘पाणी’ चित्रपट १८ ऑक्टोबर रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटात आदिनाथ कोठारे प्रमुख भूमिका साकारत आहे. याशिवाय या चित्रपटाच्या ग्रँड प्रीमियरला खास प्रियांका चोप्रा देखील उपस्थित होती. या चित्रपटासाठी अभिनेत्री परदेशातून भारतात दाखल झाली होती. दुष्काळाची भीषण परिस्थिती या ‘पाणी’ चित्रपटात दाखवण्यात आली आहे.

नागदरवाडी गावातील हनुमंत केंद्रे आणि सुवर्णा केंद्रे यांच्या आयुष्यावर आधारित ‘पाणी’ ( Paani ) हा चित्रपट आहे. नुकताच या चित्रपटाचा ग्रँड प्रीमियर सोहळा पाड पडला. यावेळी संपूर्ण सिनेसृष्टी एकत्र जमल्याचं पाहायला मिळालं. अगदी ‘बिग बॉस’मध्ये सहभागी झालेल्या जान्हवी, अंकिता आणि आर्या या तिघी सुद्धा या प्रीमियरला उपस्थित होत्या.

हेही वाचा : Video : KBC च्या इतिहासात पहिल्यांदाच स्पर्धकाने घेतला ‘हा’ निर्णय; अमिताभ बच्चन यांना बसला धक्का, म्हणाले, “मी आज…”

‘पाणी’ ( Paani ) चित्रपटाचा मुख्य अभिनेता आदिनाथ कोठारेने रेड कार्पेटवर आपली लेक जिजाबरोबर पोज दिल्याचं या प्रीमियर सोहळ्यादरम्यान पाहायला मिळालं. मात्र, संपूर्ण चित्रपटसृ्ष्टी, कोठारे कुटुंबीय या ‘पाणी’ चित्रपटासाठी एकत्र आलेले असताना उर्मिला या प्रीमियर शोमध्ये कुठेही दिसली नाही. नेटकऱ्यांनी याबाबत कमेंट्स केल्या आहेत.

आदिनाथ आणि जिजा एकत्र प्रीमियर शोसाठी आल्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओवर “बरेच दिवस उर्मिला आणि आदिनाथ एकत्र इव्हेंट अटेंड करत नाहीत. मी आशा करते की सर्व नीट आहे”, “उर्मिला कुठे आहे?”, “बायको कुठे आहे”, “उर्मिला विसरली वाटतं”, “उर्मिला का नसते आदिनाथबरोबर” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

हेही वाचा : Video : ‘चिकनी चमेली’ गाण्यावर रितेश-जिनिलीयाचा जबरदस्त डान्स; अवघ्या तासाभरात लाखो व्ह्यूज, नेटकरी म्हणाले, “वहिनी…”

urmila
नेटकऱ्यांच्या कमेंट्स

हेही वाचा : ठरलं तर मग : आश्रमावर हातोडा, रडून-रडून सायली हतबल, पण अर्जुन करणार असं काही…; विशेष भागात काय घडणार? पाहा प्रोमो

‘पाणी’ ( Paani ) हा आदिनाथ कोठारेचा दिग्दर्शन असलेला पहिला चित्रपट आहे. यामुळे अशा महत्त्वाच्या चित्रपटावेळी उर्मिला कुठेच दिसत नसल्याने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, अभिनेत्याने १८ ऑक्टोबर १९९४ मध्ये ‘माझा छकुला’ चित्रपटाच्या निमित्ताने सिनेविश्वात पदार्पण केलं होतं. तर, यंदाच्या १८ ऑक्टोबरला ३० वर्षांनी त्याने दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं आहे.