सध्या शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट आणि त्यातील नुकतंच प्रदर्शित झालेलं ‘बेशरम रंग’ हे गाणं चांगलंच चर्चेत आहे. दीपिकाने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरून चांगलाच वाद रंगला आहे. मध्य प्रदेशमधील इंदौर शहरात या गाण्याविरोधातील आंदोलन करण्यात आलं. राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनीही चित्रपटाला विरोध केला आहे. या वादामुळे ‘बॉयकॉट पठाण’ हा ट्रेंडही सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. वेगवेगळ्या स्तरातून आता या वादावर प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. आता या विरोधाचा अभिनेता आदिश वैद्य याने निषेध केला आहे.
आदिश वैद्य हा नेहमीच त्याच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असतो. समाजातील त्याला खटकणाऱ्या गोष्टींबद्दल तो उघडपणे व्यक्त होत असतो. आता ‘पठाण’ या चित्रपटाबाबत सुरू असलेल्या वादावर त्याने भाष्य करत त्याचं मत मांडलं आहे.
आणखी वाचा : ‘बिग बॉस’मधून राखी सावंतचा पत्ता होणार कट? घरातली भांडी फोडल्याने अभिनेत्रीबाबत घेण्यात आला ‘हा’ मोठा निर्णय
आदिशने नुकतीच त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी पोस्ट केली. या स्टोरीमध्ये मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या चित्रपटाबाबत केलेले विधान लिहिलेली एक पोस्ट त्याने शेअर केली आहे. ती पोस्ट स्टोरीवर शेअर करत आदिशाने लिहिलं, “मी याहून जास्त हास्यास्पद काही ऐकलेलं नाही आणि हे लोक देश चालवतात. सामाजिक सलोख्याला धक्का पोहोचवण्यासाठी हे विविध कारणं शोधत आहेत.”
हेही वाचा : “…आणि आम्ही एकमेकांच्या आणखी जवळ आलो”, आदिश वैद्यची बिग बॉसच्या स्पर्धकासाठी खास पोस्ट
‘पठाण’ हा चित्रपट तसा आधीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या नवीन गाण्यामुळे हा वाद आणखी वाढू शकतो अशी शक्यता आहे. हा चित्रपट २५ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणबरोबर जॉन अब्राहमसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.