अभिनेत्री अदिती द्रविड ही मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आतापर्यंत ती अनेक मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. अदितीचं क्रिकेटर राहुल द्रविड यांच्याशी नातं आहे. तर आता तिने त्यांच्याबरोबरचा एक फोटो शेअर करत खास कॅप्शन लिहिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अदिती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. तिच्या कामाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी ती चाहत्यांशी वरचेवर शेअर करत असते. नुकतीच तिची राहुल द्रविड यांच्याशी भेट झाली आणि त्या भेटीदरम्यानचा एक फोटो तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला आहे.

आणखी वाचा : “सुंदरा मनामध्ये भरली मालिकेसाठी किती मानधन मिळालं?” अभिनेत्रीने सांगूनच टाकलं, म्हणाली…

अदितीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती राहुल द्रविड यांच्या बाजूला उभी राहून फोटोसाठी पोज देताना दिसत आहे. तर हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं, “द्रविडियन्स.” याबरोबरच तिने राहुल द्रविड यांनाही टॅग केलं. आता तिची ही पोस्ट खूप चर्चेत आली आहे.

हेही वाचा : Video: लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री गेली होती भारत-पाकिस्तान सामना प्रत्यक्ष पाहायला, अनुभव शेअर करत म्हणाली…

अदिती आणि राहुल द्रविड एकमेकांचे नातेवाईक लागतात. राहुल द्रविड अदितीचा काका आहे. त्यामुळे अदिती राहुल द्रविड यांना भेटल्यामुळे तिचे चाहते आणि तिचे मित्रमंडळी त्यावर विविध प्रतिक्रिया देत आनंद व्यक्त करत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditi dravid shares photo with rahul dravid know about their family relation rnv