नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये विविधांगी भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अदिती सारंगधर ( Aditi Sarangdhar ) सध्या चांगलीच चर्चेत आहे. अलीकडेच तिचा ‘बाई गं’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अदितीसह अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, सुकन्या मोने, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान, सागर कारंडे आणि स्वप्नील जोशी झळकला होता. तसंच तिचं रंगभूमीवर ‘मास्टर माईंड’ नावाचं नाटक जोरदार सुरू आहे. विजय केंकर दिग्दर्शित या नाटकात अदितीबरोबर ( Aditi Sarangdhar ) अभिनेता आस्ताद काळे काम करत आहे. अशातच आता अदिती ‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’मध्ये झळकणार आहे. नुकत्याच आलेल्या मालिकेच्या नव्या प्रोमोमधून अदितीची एन्ट्री पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘झी मराठी’ वाहिनीच्या इन्स्टाग्राम पेजवर ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये गर्भवती असलेल्या नेत्राला त्रास होताना दिसत आहे. तिच्या पोटात दुखत आहेत. त्यामुळे ती जोरजोरात ओरड आहे. अद्वैत तिला हॉस्पीटलमध्ये घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत आहे. भर पावसातून अद्वैत नेत्राला हातगाडीवरून नेताना दिसत आहे. पण यावेळी गाडीच्या मधे एक दगड येतो आणि त्यामुळे गाडीचं एक चाक निखळत. तरीही अद्वैत बरेच प्रयत्न करतो. पण त्याच्याकडून गाडी पुढे ढकलतच नाही. शेवटी हतबल झालेला अद्वैत मदतीची हाक मारतो आणि तितक्यात एक महिला मदतीला धावून येते. त्यानंतर देवीच्या मंदिरात त्या महिलेच्या मदतीने नेत्रा आपल्या बाळांना जन्म देते.

हेही वाचा – “आता बाबा असते तर…”, अभिनय बेर्डेने वडील लक्ष्मीकांत बेर्डेंबद्दल इच्छा केली व्यक्त, म्हणाला…

पण काही वेळानंतर मदतीला धावून आलेली महिला दुसरी, तिसरी कोणी नसून देवी आई असते हे नेत्रा समोर येतं. नेत्रा भारावून जाते आणि देवी आईचे पाय पकडते. त्यावेळेस देवी आई सांगते की, युद्धाचा अंत अजून व्हायचा आहे. विरोचक दैत्याचा वध कर आणि त्याच्या रक्ताने मला अभिषेक घाल. त्यामुळे आता विरोचकाचा वध होताना पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री अदिती सारंगधर ( Aditi Sarangdhar ) ही देवी आईच्या भूमिकेत झळकली आहे.

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेचा नवा प्रोमो पाहा…

हेही वाचा – Navari Mile Hitlerla: लग्नानंतरच्या पहिल्या मंगळागौर कार्यक्रमात लीलाने घेतला भन्नाट उखाणा, म्हणाली, “आजी एजेंचं नाव घेऊन वचन देते…”

दरम्यान, विरोचकाचा वध होतं असल्यामुळे ही भूमिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांची ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतून एक्झिट होणार आहे. याबाबत ऐश्वर्या नारकरांनी स्वतः खुलासा केला आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditi sarangdhar entry in satvya mulichi satavi mulgi marathi serial pps