अलीकडच्या काळात बहुतांश मराठी कलाकार हे सोशल मीडियावर सक्रिय आहेत. इन्स्टाग्राम, फेसबुकच्या माध्यमातून ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. कलाकारांना वैयक्तिक आयुष्यात येणारे चांगले-वाईट अनुभव ते चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. सध्या ‘वादळवाट’ मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेल्या अभिनेत्री अदिती सारंगधरने शेअर केलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. खासगी गाडीतून प्रवास करताना तिला अत्यंत वाईट अनुभव आल्याचं तिने या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अदिती वैयक्तिक कामानिमित्त पुण्यात एका खासगी वाहनचालकाबरोबर प्रवास करत होती. यादरम्यान संबंधित चालकाला “एसी चालू करणार आहेस की नाही? आम्हाला खूप गरम होतंय.” असं अभिनेत्री सांगत असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. यानंतर काचा बंद केल्यावरच एसी लावेन असं उत्तर चालक अभिनेत्रीला देतो. पण, वाढत्या उकाड्यामुळे “एसी फास्ट कर म्हणजेच २ वर चालवं” असं अदिती त्याला सांगते. काही केल्या चालक एसी वाढवण्यास नकार देतो म्हणून अभिनेत्री त्याला गाडी पोलीस स्टेशनला घेऊन चल असं सांगते.

हेही वाचा : निलेश साबळेच्या नव्या शोमध्ये झळकणार ‘लग्नाची बेडी’ फेम अभिनेत्याची पत्नी! आजवर लोकप्रिय मालिकांमध्ये केलंय काम

व्हिडीओच्या शेवटी “तू मला उलट, उद्दाम बोलत आहेस. एसी चालू कर मला गरम होतंय…तुझा एसी पूर्ण चालतोय का?” असा प्रश्न उपस्थित करत अदिती चांगलीच संतापल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये “अतिशय घृणास्पद व लाजिरवाणा प्रकार या संबंधित चालकाला रिपोर्ट करा” असं अदितीने म्हटलं आहे. याशिवाय चालक संलग्न असलेल्या नामांकित कंपनीला देखील अभिनेत्रीने या व्हिडीओमध्ये टॅग केलं आहे.

हेही वाचा : “मी भत्ता घेणार नाही, एक लाडू घेतला तरी…”, सिद्धिविनायक मंदिराच्या वादावर आदेश बांदेकरांनी मांडलं स्पष्ट मत, म्हणाले…

अदिती सारंगधरची पोस्ट

दरम्यान, अदितीच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत घडल्या प्रकाराबद्दल संताप व्यक्त करून स्वत:चे अनुभव देखील सांगितले आहेत. अनेकांनी अभिनेत्रीला “या चालकाला खरंच तुम्ही पोलीस स्टेशनला घेऊन जायला पाहिजे होतं” असा सल्ला कमेंट सेक्शनमध्ये दिला आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditi sarangdhar shares private ride bad experience on instagram shares angry post sva 00