प्रसिद्ध अभिनेता, मॉडेल व कास्टिंग दिग्दर्शक आदित्य सिंह राजपूतचं सोमवारी(२२ मे) दुपारी निधन झालं आहे. मुंबईतील अंधेरी येथील राहत्या घरात त्याचा मृतदेह आढळल्याने मनोरंजनविश्वात खळबळ उडाली आहे. त्याच्या मृत्यूमागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. परंतु, ड्रग्जचे अतिसेवन केल्यामुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

आदित्यने निधनाच्या काही तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली होती. या स्टोरीवरुन रविवारी त्याने मित्रांबरोबर पार्टी केल्याचं दिसत आहे. ‘Sunday Funday With Besties” असं कॅप्शन त्याने या स्टोरीला दिलं होतं. मृत्यूपूर्वी आदित्यने शेअर केलेली ही शेवटची पोस्ट ठरली आहे.

phulambri Fire shop, phulambri, Fire in a shop,
छत्रपती संभाजीनगर : फुलंब्रीतील दुकानात आगीनंतर भडका; तिघांचा मृत्यू, दोघे गंभीर
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
vegetable vendor Murder, Murder at Mira Road,
मिरा रोड येथे भाजी विक्रेत्याची गळा चिरून हत्या
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून
Asaduddin Owaisi Statement over Modi
Asaduddin Owaisi : “आंबेडकर जिंदा है तो गोडसे…”, असदुद्दीन ओवैसींची पंतप्रधान मोदींच्या विधानावर जोरदार टीका
Padmashri Physicist Dr Rohini Godbole Memoirs by Researcher Dr Radhika Vinze
विज्ञानव्रती
selfie point shock death
भाईंदर: महापालिकेच्या सेल्फी पॉईंटमधील विजेचा धक्का, जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
kangana grandmother dies
कंगना रणौतच्या आजीचं झालं निधन; इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करीत अभिनेत्री म्हणाली…
aditya-singh-rajput-died (1)

आदित्य अंधेरीतील एका इमारतीत ११व्या मजल्यावर राहत होता. काही मित्रांना घरातील बाथरुममध्ये त्याचा मृतदेह आढळला. आदित्यच्या मित्रांनी वॉचमॅनच्या मदतीने त्याला लगेचच रुग्णालयात दाखल केलं होतं. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

आदित्यने मॉडेलिंगपासून मनोरंजनविश्वातील करिअरला सुरुवात केली होती. त्याने अनेक मालिका व चित्रपटांतही काम केलं आहे. ‘क्रांतिवीर’, ‘मैने गांधी को नही मारा’ या चित्रपटात तो झळकला होता. याशिवाय एमटीव्हीवरील ‘स्प्लिट्सविला’ या रिएलिटी शोमध्येही आदित्य सहभागी झाला होता. त्याने ३००हून अधिक जाहिरातीत काम केलं आहे. ‘गंदी बात’ या वेब सीरिजमध्येही आदित्यने काम केलं आहे. त्याने पॉप कल्चर हा ब्रँड सुरू केला होता. या ब्रँडद्वारे त्याने अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देत कलाकरांना लॉन्च केलं होतं.