स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लक्ष्मीच्या पाऊलींनी’ ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. मालिकेतील अद्वैत चांदेकर आणि कला खरे या दोन्ही पात्रांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहे. दोघांमधील केमेस्ट्री प्रेक्षक फार पसंत करतात. मालिकेत हे दोघेही सतत एकमेकांशी वाद आणि भांडणे करताना दिसतात. मात्र, या भांडणातूनही त्यांच्या नात्यात प्रेमाचा गोडवा असल्याचंदेखील दिसतं. अशात आता अद्वैतने कलासमोर थेट तिची सवत आणली आहे. त्याचा एक व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवरील विविध मालिकांसह ‘आता होऊ दे धिंगाणा ३’ या कार्यक्रमाने सर्वच कलाकारांना आणि प्रेक्षकांना भूरळ घातली आहे. यातील प्रत्येक भागात विविध मालिकांतील कलाकार पाहुणे म्हणून येतात आणि भरपूर मजा मस्ती करतात. अशात आता या कार्यक्रमाच्या पुढील भागात ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेतील कलाकार हजेरी लावणार आहेत. त्याचा एक प्रोमो व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये अद्वैत कलासमोर तिची सवत घेऊन येतो.
हेही वाचा : रणबीर कपूरच्या ‘धूम ४’मध्ये खलनायक कोण असणार? दाक्षिणात्य अभिनेत्याची वर्णी लागण्याची शक्यता
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अद्वैत जर्मनीच्या एमिलीला घेऊन मंचावर येतो. येथे येताच कलाला पाहून “हाय सवत”, असं एमिली म्हणते. ते ऐकून कला तिला समजवण्याचा प्रयत्न करते. अद्वैतचं लग्न झालं आहे, तो माझा आहे, हे ती तिला वारंवार सांगते. मात्र, अद्वैतला जिंकायचे असेल तर एक स्पर्धा खेळावी लागेल असं एमिली कलाला म्हणते. आता आपला पती परत मिळावा म्हणून कलासुद्धा ही शर्यत खेळण्यासाठी तयार होते.
प्रोमो व्हिडीओमध्ये कला आणि एमिली दोघीही सुरुवातीला पंजा लढवतात. त्यानंतर त्या पाटीवर चित्र काढण्याचा एक खेळ खेळताना दिसत आहेत. शर्यतीत मोठ्या जिद्दीने खेळल्यावर कला यामध्ये हारली की जिंकली हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. ‘आता होऊ दे धिंगाणा ३’ कार्यक्रमाचा हा भाग शनिवार-रविवार रात्री ९ वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर पाहता येणार आहे.
‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. यामध्ये कला हे पात्र अभिनेत्री ईशा केसकर साकारत आहे, तर अद्वैत चांदेकर हे पात्र अक्षर कोठारी साकारत आहे. त्यांच्यासह या मालिकेत दीपाली पानसरे, मंजुषा गोडसे, किशोरी अंबिये अशा तगड्या कलाकारांची स्टारकास्ट आहे. लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिकेत सध्या आनंदाचं वातावरण आहे. नयना गरोदर आहे, त्यामुळे तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम सुरू आहे. मात्र, नयना गरोदर नसून ती सर्व नाटक करत आहे हे रोहिणीला माहिती झालं आहे. तसेच कलालादेखील नयना गरोदर असल्याचं नाटक करते आहे हे समजलं आहे.
हेही वाचा : “तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
आता नयनाने सर्वांची केलेली फसवणूक समोर आल्यावर चांदेकर कुटुंबीय काय पाऊल उचलणार? रोहिणीच्या प्लानप्रमाणे कला आणि नयना दोघींनाही चांदेकरांच्या कुटुंबातून बाहेरचा रस्ता दाखवला जाणार का? हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.