Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात जबरदस्त ड्रामा पाहायला मिळत आहे. पहिल्या दिवसापासून कोणी जेवणावरून तर कोणी बेडवरून भांडताना दिसत आहेत. नुकतंच जेलमध्ये जाण्यावरून घरात मोठा राडा झाला. यावेळी ‘बिग बॉस’ स्वतःही वैतागले. पण, ‘बिग बॉस’ला गुणरत्न सदावर्तेंनी ( Gunaratna Sadavarte ) दिलेल्या उत्तराची सध्या चांगलीच चर्चा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

१० ऑक्टोबरच्या भागात तजिंदर पाल सिंह बग्गा आणि हेमा शर्मा यांना जेलमधून बाहेर काढण्यासाठीची प्रक्रिया झाली. दोघांपैकी कोणा एकाला जेलबाहेर काढण्यासाठी ‘बिग बॉस’ने त्यांच्या समर्थकांना हात वर करायला सांगितला. पण, सर्व सदस्यांना तजिंदर आणि हेमा दोघांदेखील जेलबाहेर काढायचं होतं. यामध्ये अविनाश मिश्रा, करण मेहरा आणि ईशा सिंह एकमतावर ठाम होते. परंतु, इतर सदस्य सतत दोघांदेखील जेलबाहेर करण्याबाबत चर्चा करत होते. त्यामुळे ‘बिग बॉस’ म्हणाले, “मी आता थोडा वैतागलोय.” हे ऐकताच गुणरत्न सदावर्तेंनी ( Gunaratna Sadavarte ) ‘बिग बॉस’ला त्यांच्या मजेशीर शैलीत उत्तर दिलं.

हेही वाचा – Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्ते ‘बिग बॉस’मधील १७ सदस्यांवर पडले भारी, जेलमध्ये न जाण्यासाठी काय-काय केलं? जाणून घ्या…

गुणरत्न सदावर्ते बिग बॉसला म्हणाले,”‘बिग बॉस’चं १८वं पर्व आहे. त्यामुळे तुमचं वय १८ झालं आहे. म्हणूनच तुम्ही अजूनही तरुण आहात. वैतागू नका.” सदावर्तेंच्या या उत्तराची चर्चा होत असून त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – Bigg Boss 18: दीड लाखांचा हिरेजडीत सूट घालून केला भन्नाट डान्स; गुणरत्न सदावर्तेंचा हटके अंदाज पाहिलात का?

हेही वाचा – Video : “आपली पायरी…”, धनंजय पोवार पुन्हा परतला कामावर, बऱ्याच दिवसांनी मालकाला पाहिल्यानंतर कर्मचारी म्हणाले…

दरम्यान, पहिल्याच आठवड्यात गुणरत्न सदावर्ते ( Gunaratna Sadavarte ) ‘बिग बॉस’च्या घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. त्यांच्यासह करण मेहरा, अविनाश मिश्रा, मुस्कान बामने आणि चाहत पांडे नॉमिनेट झाली आहे. आता या पाच सदस्यांपैकी कोण पहिल्याच आठवड्यात ‘बिग बॉस’च्या घराचा निरोप घेतंय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.