अमृता खानविलकर मराठी चित्रपटसृष्टीमधील आघाडीची अभिनेत्री आहे. काही महिन्यांपूर्वी तिचा ‘चंद्रमुखी’ हा सुपरहिट चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. तिने मराठीसह अनेक हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. गेल्या काही दिवसांपासून ती ‘झलक दिखला जा’ या हिंदी रिअ‍ॅलिटी शोच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये या कार्यक्रमाचे दहावे पर्व सुरु झाले. या कार्यक्रमामध्ये माधुरी दीक्षित, करण जोहर आणि नोरा फतेही परिक्षक म्हणून काम करत आहेत. कालच्या भागामध्ये अमृता खानविलकर तिच्या कोरिओग्राफरसह या स्पर्धेतून बाहेर गेल्याची बातमी समोर आली.

हा भाग प्रसारित झाल्यानंतर अमृताच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत आहेत. एका यूजरने ‘आज अमृता झलक दिखला जा १० मधून बाहेर पडली. या कार्यक्रमामध्ये नृत्यापेक्षा नाटकाला अधिक प्राधान्य दिले जाते’, अशी कमेंट केली आहे. दुसऱ्या यूजरने ‘ही वाहिनी त्यांच्या लोकांचा बचाव करत आहे. या लोकांना खऱ्या प्रतिभेची कदर नाही. शोमधल्या खऱ्या डान्सरला ते कसं बाहेर काढू शकतात’, असे म्हटले आहे.

Saif Ali Khan was brutally attacked by a robber (Photo- Indian Express )
Kareena Kapoor : “करीना कपूर २१ कोटींचं मानधन घेते तरीही तिला सुरक्षारक्षक आणि…”, सैफ हल्ला प्रकरणावरुन ‘या’ अभिनेत्याचा टोला
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
when udit narayan kissed shreya ghoshal
Video: उदित नारायण यांनी श्रेया घोषालला भर मंचावर केलेलं किस; गायिकेची प्रतिक्रिया झालेली व्हायरल
laxmi narayan tripathi on mamta kulkarni
ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर केलं अन् तिच्यासह झाली हकालपट्टी; त्रिपाठी म्हणाल्या, “तिने इस्लाम…”
IT girl murder, rape case, Mumbai,
विश्लेषण : मुंबईत आयटी तरुणी हत्या, बलात्कार प्रकरणात तपासातील त्रुटींमुळे आरोपी निर्दोष… नेमके प्रकरण काय होते?
Saif Ali Khan Records Statement With Mumbai Police
Saif Ali Khan : सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शहजादला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
Kshitee Jog
क्षिती जोगने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिका का सोडलेली? अभिनेत्री म्हणाली, “खूप चुकतंय…”
shreya talpade and aloknath fir
अभिनेता श्रेयस तळपदे आणि आलोक नाथ यांच्यावर गुन्हा दाखल, फसवणुकीच्या प्रकरणात आले नाव; काय आहे प्रकरण?

आणखी वाचा – संभाजीराजे छत्रपतींनंतर आता राष्ट्रवादी आक्रमक, चित्रपट निर्मितीवर जयंत पाटील म्हणाले “…तर सहन करणार नाही”

या आठवड्यामध्ये स्पर्धकांना त्यांचे कोरिओग्राफर्स बदलून दुसऱ्याच्या कोरिओग्राफरसह डान्स करायचा होता. तेव्हा तिने सनम जोहरबरोबर मायकल जॅक्सनच्या नृत्यशैलीतला डान्स केला होता. नाचताना ती मध्ये काही स्टेप्स विसरली. पण एक-दोन सेकंदानंतर तिने पुन्हा नाचायला सुरुवात केली. याचा परिणाम निकालावर झाला आणि तिला स्पर्धेबाहेर जावे लागले. तिने सोशल मीडियावर या कार्यक्रमाबद्दल व्यक्त होत एक व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा – गाडीच्या छतावर बसून दाक्षिणात्य सुपरस्टारने मोडले वाहतूकीचे नियम, व्हिडीओ व्हायरल

या व्हिडीओला तिने “मागचे दोन महिने माझ्यासाठी विलक्षण सुख देणारे होते. या काळामध्ये मी सर्वात जास्त आनंदी होते. पण आज जसा झलक दिखला जाच्या नवा भाग प्रसारित झाला, तसं मी नकळत त्या सुंदर रंगमंचाला निरोप दिला. आज जेव्हा मी अलिबागच्या या चांदण्यांनी भरलेल्या आकाशाखाली बसून या प्रवासाकडे वळून पाहले, तेव्हा या कार्यक्रमामध्ये आणि प्रवासामध्ये मला साथ देणाऱ्या लोकांच्या आठवणीने भरुन आले”, असे कॅप्शन दिले आहे.

Story img Loader