Munawar Faruqui Breaking News: बाबा सिद्धीकी (Baba Siddique Shot Dead) यांची शनिवारी (१२ ऑक्टोबर) रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली आहे. त्यांच्या खुनाच्या घटनेनंतर त्यांचा मित्र व अभिनेता सलमान खानच्या सुरक्षा बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. दुसरीकडे आता बिग बॉस १७ चा विजेता व स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीची सुरक्षादेखील वाढवण्यात आली आहे.

लॉरेन्स बिश्नोई गँगच्या काही लोकांनी गेल्या महिन्यात मुनव्वरला दिल्लीत ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. टाइम्स ऑफ इंडियाने एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. मुनव्वर फारुकीला सुरक्षा पुरवण्यात आली आहे, अशी माहिती या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मात्र सुरक्षेचे कारण देत त्याने जास्त तपशील देण्यास नकार दिला. लॉरेन्स बिश्नोईच्या गँगमधील काही लोकांनी मुनव्वरचा पाठलाग केला होता. सप्टेंबर महिन्यात दिल्लीतील ज्या हॉटेलमध्ये मुनव्वर थांबला होता तिथेच त्यांनी खोली बूक केली होती. मात्र गुप्तचर यंत्रणांनी वेळीच यासंदर्भात माहिती दिल्याने मुनव्वरला सुरक्षितपणे दुसरीकडे नेण्यात आलं होतं.

prevent tax evasion without any hesitation dcm ajit pawar s instructions to senior officials
हयगय न करता करचोरी, गळती रोखा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Bigg Boss 18 Edin Rose Yamini Malhotra is evicted from salman khan show after digvijay rathee evicted
Bigg Boss 18: दिग्विजय सिंह राठीनंतर आणखी दोन सदस्य घराबाहेर; कशिश कपूर ढसाढसा रडत म्हणाली, “इथे प्रत्येकजण साप…”
Bigg Boss 18 Digvijay Singh Rathee says who will win the show
Bigg Boss 18: दिग्विजय सिंह राठीच्या मते करणवीर मेहरा नाही, तर ‘हा’ सदस्य होणार विजयी; म्हणाला…
Bigg Boss 18 Digvijay Rathee is EVICTED from salman khan show
Bigg Boss 18: फिनालेच्या चार आठवड्यांआधी अचानक ‘हा’ सदस्य घराबाहेर; शिल्पा शिरोडकर, ईशा सिंहला अश्रू झाले अनावर
Bigg Boss फेम कलाकारांचा नवीन शो सुरू होणार?
Bigg Boss फेम कलाकारांचा नवीन शो सुरू होणार? छोटा पुढारी घन:श्यामने शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोमुळे मिळाली हिंट
Canadian-American actor Pamela Anderson was the highest-paid contestant in the history of Bigg Boss earning 2.5 crore for 3 days
Bigg Boss: सिद्धार्थ शुक्ला, विवियन डिसेना नाही तर ‘या’ स्पर्धकाला दिलेलं मोठं मानधन, फक्त तीन दिवसांचे मिळालेले २.५ कोटी
Bigg Boss 18 Shrutika Arjun is the new time god in salman khan show
Bigg Boss 18: विवियन डिसेना, करणवीर मेहरा नाही तर ‘हा’ सदस्य झाला नवा ‘टाइम गॉड’; दोन आठवडे नॉमिनेशनपासून राहणार सुरक्षित

हेही वाचा – Salman Khan : सलमान खानच्या सुरक्षेची आव्हानं काय? बॉडीगार्ड शेरा कसं करतो नियोजन; स्वतःच केलेला खुलासा

“हिंदू देवांवर मुनव्वरने केलेल्या टिप्पण्यांमुळे ही गँग त्याच्यावर संतापली आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये दिल्लीतील एका कार्यक्रमात शूटर्सना त्याला मारण्यास सांगण्यात आलं होतं. त्या शूटर्सनी मुंबईहून त्याच फ्लाइटने त्याच्याबरोबर दिल्लीपर्यंत प्रवास केला होता. तसेच मुनव्वर दिल्लीत ज्या हॉटेलमध्ये थांबला होता, तिथेच त्यांनी खोली बूक केली होती. यासंदर्भात इनपुट्स मिळताच गुप्तचर यंत्रणांनी दिल्ली पोलिसांना सतर्क केलं आणि त्यांनी शूटर्सचा कट उधळून लावला,” असं एका अधिकाऱ्याने सांगितलं.

हे ही वाचा – Video: ‘बिश्नोई गँग आणि भारतीय गुप्तहेर एकत्र काम करतात’, कॅनडा पोलिसांचा दावा; भारताच्या कडक भूमिकेनंतर जळफळाट

नेमकं काय घडलं होतं?

मुनव्वर फारुकी ( Munawar Faruqui ) आणि युट्यूबर एल्विश हे दोघंही दिल्लीतील सूर्या हॉटेलमध्ये होते. दोघंही आजीआय स्टेडियमवर मैत्रीपूर्ण सामना खेळण्यासाठीही गेले होते. त्यावेळीच ही धमकी देण्यात आली. हल्लेखोरांनी हॉटेलची रेकी केल्याचंही समजलं होतं. ज्यानंतर हा सामना थांबवण्यात आला. पोलिसांनी स्टेडियमची पूर्ण पाहणी केली. स्टेडियमची पाहणी केल्यानंतर सामना सुरु करण्यात आला. सामना संपल्यानंतर मुनव्वर फारुकीला मुंबईला पाठवण्यात आलं होतं.

Story img Loader