टेलीव्हिजन विश्वातील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम म्हणजे ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. या कार्यक्रमाचे महाराष्ट्रातच नव्हे तर परदेशातही लाखो प्रेक्षकवर्ग आहेत. त्यामुळे काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमातील लोकप्रिय विनोदवीर अमेरिका दौऱ्यावर गेले होते. यानंतर आता उद्यापासून पोट धरून आणि पोट भरून हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचं नवं पर्व सुरू होतं आहे. त्यानिमित्तानं कार्यक्रमातील कलाकार मंडळी प्रमोशन करताना दिसतं आहेत. अशातच एका एंटरटेन्मेंट यूट्युब चॅनेलशी बोलत असताना दत्तू मोरे यांच्यानंतर कोणता कलाकार लग्नबंधनात अडकणार आहे? याचा खुलासा झाला आहे.
‘मज्जा’ या युट्यूब चॅनेलवरील मुलाखतीमध्ये गौरव मोरे व निमिष कुलकर्णी सहभागी झाले होते. यावेळी त्या दोघांना विचारलं गेलं की, ‘दत्तू मोरेनंतर आता पुढचं लग्न कोणाचं असणार आहे?’ यावर निमिष मजेत म्हणाला की, “दत्तू मोरेनंतर आता गौरव मोरेचं लग्न असणार आहे. कॅनडाची मुलगी असेल. मधे तीन दिवस तो कॅनडात होता, तिथे पंजाबी मुलगी होती.” यावर गौरव म्हणाला की, “असं काही नाही.”
हेही वाचा – “…त्या दिवशी माझा सगळा माज उतरला”; स्पृहा जोशीनं सांगितला अनुभव, म्हणाली…
हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री झळकणार ‘सिंधुताई माझी माई’ मालिकेत; दिसणार ‘या’ भूमिकेत
त्यानंतर या मुलाखतीमध्ये समीर चौघुले सहभागी झाले. ते गौरव मोरेच्या लग्नाविषयी म्हणाले की, “गौरवचं लग्न होणार नाही. मला असं वाटतंय की, गौरवनं स्वयंवर करायला हवं. एका हॉलमध्ये मुली हातात हार घेऊन उभ्या आहेत आणि हा त्यांच्यातली एक निवडेल. असं त्याचं स्वयंवर व्हायला हवं. सध्या महाराष्ट्रातला तो मोस्ट एलिजिबल बॅचलर (Most Eligible Bachelor) आहे. कारण अमेरिकेतल्या शोमध्ये गौरवची एंट्री झाल्यावर मी तरुण मुलींना ओरडताना पाहिलं आहे. त्यामुळे मला माहितेय त्याची लोकप्रियता काय आहे.”