बॉलिवूड चित्रपटांच्या प्रमोशनसाठी एक हक्काचे व्यासपीठ म्हणजे ‘द कपिल शर्मा शो’ हा कार्यक्रम, गेली अनेकवर्ष हा कार्यक्रम सुरु आहे. यात प्रेक्षकांचे मानवराजन करणारे कलाकार कार्यक्रम सोडत असले तरी कपिल शर्मा मात्र कायम टिकून आहे. आता याच कार्यक्रमावर पुन्हा एकदा एका निर्मात्याने टीका केली आहे. या कार्यक्रमाला पनवती म्हंटले आहे.

अक्षय कुमार व इम्रान हाश्मीचा सेल्फी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्यांनी कपिल शर्माच्या शोमध्ये जाण्यास नकार दिला आहे. यावरच के आर के म्हणजेच कमाल आर खान ट्विट याने ट्वीट करत अक्षय कुमारचे कौतुक केलं आहे. तो असं म्हणाला, “अखेर अक्षय कुमारने एक चांगला निर्णय घेतला तो म्हणजे त्याचा चित्रपट सेल्फी हा कपिल शर्माच्या कार्यक्रमात प्रमोट न करण्याचा, अक्कीला सुद्धा माहिती झालं आहे त्याचा कार्यक्रम हा पनवती आहे.” असे ट्वीट त्याने केले आहे.

अक्षय कुमार, इम्रान हाश्मीचा चाहत्यांना सुखद धक्का; प्रमोशनसाठी चक्क मुंबई मेट्रोने प्रवास

या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एक हटके संकल्पना केली. यावेळी त्यांनी चक्क मुंबई मेट्रोने प्रवास केला. या प्रवासादरम्यान दोघांनी चाहत्यांबरोबर सेल्फी काढले. या चित्रपटातील मै खिलाडी या गाण्यावर मेट्रोतील प्रवाशांबरोबर थिरकताना दिसले. सोशल मीडियावर त्यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान अक्षय कुमार आणि इम्रान हाश्मीचा ‘सेल्फी’ २४ फेब्रुवारीला ‘प्रदर्शित होणार आहे. यांच्याबरोबरच नुशरत भरूचा, डायना पेंटि या अभिनेत्रीसुद्धा प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. याची निर्मिती करण जोहर आणि दाक्षिणात्य अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन या दोघांनी मिळून केलेली आहे. शिवाय राज मेहता यांनी याचं दिग्दर्शन केलं आहे