सध्या ऐतिहासिक चित्रपटांची लाट आली आहे. सुबोध भावेचा हर हर महादेव चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्यामुळे एकूणच सध्या वातावरण तापले आहे. सध्या अनेक अभिनेते अभिनेत्री ऐतिहासिक भूमिकेत दिसत आहेत. ‘स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून प्राजक्ता गायकवाड पुन्हा एकदा ऐतिहासिक भूमिकेत दिसणार आहे.

प्राजक्ता गायकवाड सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते, तिचे फोटोस व्हायरल होत असतात. तिने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात ती डबिंग स्टुडिओमध्ये डबिंग करताना दिसत आहे. पुन्हा एकदा तोच इतिहास तीच भूमिका असा कॅप्शन तिने या पोस्टला दिला आहे. मात्र अद्याप चित्रपटाची घोषणा केलेली नाही. अथवा भूमिकेबद्दल पूर्ण माहिती मिळाली नाही. तिच्या या पोस्टमुळे साहजिकच चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. तिच्या चाहत्यांनी कॉमेंट करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत येसूबाईंच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री म्हणून प्राजक्ता गायकवाडला ओळखले जातं. तिची ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली होती. या भूमिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली. प्राजक्ताने काही कारणांमुळे ‘आई माझी काळुबाई या मालिकेतून काढता पाय घेतला. प्राजक्ता ही लवकरच ‘लॉकडाउन लग्न’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Story img Loader