Aishwarya And Avinash Narkar New Home : ऐश्वर्या व अविनाश नारकरांनी नुकतीच त्यांच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर या जोडप्याला नव्या घराचा ताबा मिळाला. बुधवारी सायंकाळी इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत अभिनेत्रीने नवीन घर घेतल्याची पहिली हिंट चाहत्यांनी दिली होती. आज नव्या फ्लॅटचा संपूर्ण व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने अविनाश नारकरांनी नवीन घर खरेदी केल्याचं सांगितलं आहे.

ऐश्वर्या व अविनाश नारकर यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आजवर दोघांनीही विविध नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. टेलिव्हिजन विश्वातील असंख्य गाजलेल्या मालिकांमध्ये या दोघांनी भूमिका साकारल्या आहेत. आता सुद्धा हे जोडपं मालिकाविश्वात सक्रियपणे काम करत आहे. याशिवाय सोशल मीडियावरील ट्रेडिंग गाण्यांवर भन्नाट रील्स व्हिडीओ बनवून हे जोडपं कायम चर्चेत असतं. सध्या नवीन घर घेतल्यामुळे ऐश्वर्या व अविनाश नारकरांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

हेही वाचा : “ट्रक उलटून माझा मृत्यू झाला तर…”, घोडबंदर मार्गाने प्रवास करणारा अभिनेता संतापला; म्हणाला, “घाणेरड्या रस्त्यांमुळे…”

ऐश्वर्या नारकरांनी ( Aishwarya And Avinash Narkar ) नव्या फ्लॅटची झलक आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. सर्वप्रथम घर बूक केल्यावर या जोडप्याला घराच्या किल्ल्या देण्यात येतात. या किल्ल्या पाहून अभिनेत्रीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. आपलं नवीन घर पाहून अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. नारकरांच्या नव्या घरातील प्रशस्त बाल्कनी, बाहेर दिसणारा सुंदर व्ह्यू लक्षवेधी ठरतो.

हेही वाचा : अखेर ७ वर्षांनी वाद मिटला! जखमी गोविंदाची भाचा कृष्णा अभिषेकने घेतली भेट; म्हणाला, “मामींना भेटण्याची भीती…”

Aishwarya And Avinash Narkar New Home
ऐश्वर्या व अविनाश नारकरांचं नवीन घर ( Aishwarya And Avinash Narkar New Home )

अभिनेत्री हा व्हिडीओ शेअर करत लिहितात, “घर… अविच्या नावावरचं पाहिलं घर! सतत दुसऱ्यांची स्वप्न पूर्ण करण्याचा विचार! राहत्या घरावर पण माझंच नाव!अगदी घरातल्या ताट-वाटीवर सुध्दा माझंच नाव आहे. पण, आज खूप छान वाटतंय… तुझी न बाळगलेली सर्व स्वप्न पूर्ण होवोत happy home…अविनाश”

हेही वाचा : Video : आज आई-बाबा असते तर…; पुरस्कार मिळताच पालकांच्या आठवणीत ‘शिवा’ला अश्रू अनावर; मुक्ता बर्वेने दिला धीर

दरम्यान, ऐश्वर्या ( Aishwarya And Avinash Narkar ) यांनी शेअर केलेल्या नव्या घराच्या व्हिडीओवर अमृता बने, अश्विनी कासार, तितीक्षा तावडे या कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.