Aishwarya And Avinash Narkar : आज महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. एकूण २८८ विधानसभा मतसंघांमध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व नागरिकांनी पुढे येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असं आवाहन गेल्या काही दिवसांपासून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता सामान्य लोक, राजकीय नेते तसेच मनोरंजन विश्वातील सेलिब्रिटी घराबाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावत असल्याचं पाहायला मिळत आहे.

सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, अक्षय कुमार, फरहान अख्तर, प्राजक्ता माळी, रितेश व जिनिलीया देशमुख यांनी आपला मतदानाचा हक्क बुधवारी सकाळीच बजावला आहे. तसेच हे सेलिब्रिटी सामान्य नागरिकांना सुद्धा मतदान करा असं आवाहन करत आहेत. मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडी ऐश्वर्या व अविनाश नारकर यांनी देखील आपलं मतदानाचं कर्तव्य पार पडत एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Amit thackeray meet Sada sarvankar
Mahim Constituency : सरवणकरांच्या खिशावरील धनुष्यबाण चिन्ह पाहताच अमित ठाकरेंनी केलेली कृती चर्चेत; सिद्धिविनायक मंदिरात आले आमने-सामने!
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
supriya sule viral audio clip
Video: “ते रेकॉर्डिंग आल्या आल्या मी सगळ्यात आधी…”, सुप्रिया सुळेंची बिटकॉईन ऑडिओ क्लिपवर प्रतिक्रिया!
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
vivek oberoi shifts in new home on 14th wedding anniversary
लग्नाच्या १४ व्या वाढदिवशी नव्या घरात गृहप्रवेश! विवेक ओबेरॉयचं पत्नीला खास गिफ्ट, प्रियांका आहे माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी
sara ali khan dating rumours with congress leader arjun pratap bajwa
सारा अली खान पुन्हा प्रेमात, ‘या’ युवा नेत्याला करतेय डेट? केदारनाथमधील व्हायरल फोटोमुळे चर्चांना उधाण
Yogi Adityanath Death Threat
Yogi Adityanath Death Threat : ‘१० दिवसांत राजीनामा द्या, अन्यथा बाबा सिद्दिकी यांच्यासारखा शेवट करू’; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकी
AR Rahman And Saira Banu Part Ways After 29 Years Of Marriage
AR Rahman Divorce : २९ वर्षांचा संसार मोडला; ए. आर. रेहमान व सायरा बानू होणार विभक्त, जारी केलं निवेदन

हेही वाचा : रितेश-जिनिलीयाने लातूरमध्ये बजावला मतदानाचा हक्क! देशमुखांची सून म्हणाली, “सर्वांनी पुढे येऊन…”

मराठी नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी लोकप्रिय जोडी म्हणून ऐश्वर्या व अविनाश नारकर यांच्याकडे पाहिलं जातं. हे दोघंही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. अभिनेत्रीने नुकताच एक व्हिडीओ शेअर करत सर्वसामान्य नागरिकांना मतदान करा असं आवाहन केलं आहे.

ऐश्वर्या व अविनाश नारकर आपल्या राहत्या घराजवळील परिसरात जोडीने मतदान करण्यासाठी गेले होते. यावेळी या जोडप्याला त्यांचे चाहते देखील भेटले. याचा खास व्हिडीओ अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

ऐश्वर्या नारकरांनी या व्हिडीओला एका खास गाणं लावलं आहे. हे गाणं अविनाश नारकरांचा आगामी चित्रपट ‘वर्गमंत्री’मधलं आहे. ‘इलेक्शन आलं इलेक्शन’ असं या गाण्याचं नाव असून, “बोटाला शाई टेन्शन नाही, हक्काचं वोटिंग चुकवायचं नाही…सुजाण नागरिक समजून जा, योग्य उमेदवार निवडून द्या. असली कोण, नकली कोण? करतंय कोण? भरतंय कोण? फड-फडतंय कोण? धडपडतय कोण? ठरवील जनता नेता कोण?” असे या गाण्याचे बोल आहेत. त्यामुळे नारकर जोडप्याचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. “मतदानाचा मूलभूत अधिकार…” असं कॅप्शन अभिनेत्रीने या व्हिडीओला दिलं आहे.

हेही वाचा : “आम्ही आमचं कर्तव्य पार पाडलं, आता पुढील पाच वर्षे…”, मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, पोस्ट करत म्हणाले…

दरम्यान, नारकर जोडपं ( Aishwarya And Avinash Narkar ) जोडीने मतदान करण्यासाठी गेले असताना या दोघांनी Twinning केल्याचं पाहायला मिळालं. याशिवाय या दोघांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या ऐश्वर्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत काम करत आहेत. तर, अविनाश नारकर लवकरच ‘स्टार प्रवाह’च्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम!’ या मालिकेत झळकणार आहेत.