Aishwarya And Avinash Narkar : ऐश्वर्या व अविनाश नारकर यांच्या लग्नाला नुकतीच २९ वर्षे पूर्ण झाली आहेत. मराठी मालिका, चित्रपट व रंगभूमी गाजवणारी प्रेक्षकांची लाडकी जोडी म्हणून या जोडप्याकडे पाहिलं जातं. दोघेही गेली अनेक वर्ष मराठी कलाविश्वात कार्यरत आहेत. ऐश्वर्या व अविनाश या दोघांचाही फिटनेस आजच्या तरुणपिढीला लाजवेल असाच आहे. सुखी संसाराला २९ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ऐश्वर्या यांनी खास पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
लग्नाच्या वाढदिवसानिमित्त नारकर जोडप्याने खास पारंपरिक लूक केला होता. यावेळी ऐश्वर्या यांनी सुंदर अशी लाल रंगाची साडी नेसून, गळ्यात छानसा नेकलेस, केसात कजरा माळून मराठमोळा लूक केला होता. यानंतर नारकर जोडप्याने एकत्र केक कापून आपल्या लग्नाच्या वाढदिवसाचा आनंद साजरा केला. “संसाराची २९ वर्षे” साजरी केली असं कॅप्शन अभिनेत्रीने या व्हिडीओला दिलं आहे.
ऐश्वर्या नारकरांनी ( Aishwarya Narkar ) या व्हिडीओला सुंदर असं कॅप्शन दिलं आहे. त्या लिहितात, “कालचा दिवस ( ३ डिसेंबर ) माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. कारण, आमच्या लग्नाला २९ वर्षे पूर्ण झाली आहेत. तुझ्यामुळे मला पूर्णत्व येतं…त्यामुळे तू कायम माझ्याबरोबर राहा. तुझा पाठिंबा, प्रेम हे सगळं माझ्या आयुष्यात खूप खूप महत्त्वाचं आहे अविनाश…लव्ह यू फॉरएव्हर”
ऐश्वर्या व अविनाश नारकरांच्या या लग्नाच्या वाढदिवसाच्या व्हिडीओवर सिनेविश्वातील अभिजीत खांडकेकर, सुरुची अडारकर, हर्षदा खानविलकर, शर्वरी लोहकरे अशा बऱ्याच कलाकारांनी कमेंट्स करत या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, रंगभूमीवर काम करताना पल्लवी ( ऐश्वर्या यांचं माहेरचं नाव) आणि अविनाश यांची ओळख झाली. नाटकाबरोबरच तेव्हा अविनाश एका लोकप्रिय मालिकेत काम करत होते. त्यामुळे मोठे अभिनेते असल्याने ऐश्वर्या सुरुवातीला त्यांच्याशी फार बोलत नव्हत्या. नाटकाच्या प्रयोगाला एकत्र बसने प्रवास करताना हळुहळू या दोघांची एकमेकांशी ओळख झाली. पुढे दोघांमध्ये मैत्री होऊन याचं रुपांतर प्रेमात झालं. अविनाश यांनी लग्नाची मागणी घातल्यावर यांचा ( Aishwarya Narkar ) विवाहसोहळा पार पडला होता.